नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात आश्चर्यकारक असे काहीच घडले नाही मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता गेली, तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे हे निवडणुकीच्या साठी एकत्र आले पण प्रत्यक्षात त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले.
महत्त्वाचे म्हणजे भाजपने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन मुंबईत ठाकरे बंधूंवर मात केली, पण अजित पवारांना दूर लोटून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांची सुमडीत कोंबडी कापली. पवार काका – पुतण्याच्या पक्षांची पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये दारुण अवस्था करून ठेवली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही एकत्र लढायचा निर्णय घेऊन आपले राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. अजित पवारांनी तर पुण्याच्या गल्लीबोळांमध्ये रोड शो करून मोठा प्रचार करून रणधुमाळी उडवून दिली होती. परंतु अजित पवारांना पुणेकरांनी आणि पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामस्थांनी ठामपणे नाकारले त्यांनी भाजपला पुन्हा एकदा स्वीकारले.
– महेश लांडगे ठरले भारी
वास्तविक भाजपनेच ही Game व्यवस्थित घडवून आणली. भाजपने महापालिका निवडणुकीत अशीच राहिलेली आपली की त्यांनी एकनाथ शिंदे यांना जवळपास प्रत्येक महापालिकेत आपल्याबरोबर घेतले. अपवाद फक्त नाशिक आणि अहिल्यानगरचा ठरला. त्याउलट पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपने अजित पवारांना बरोबर घ्यायला नकार दिला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तुमची ही ताकद फार मोठी आहे. त्यामुळे आपण स्वबळावरच निवडणूक लढवलेले चांगले असे भाजपने त्यांच्या मनावर ठसाविले. त्यामुळे अजितदादा सुद्धा इरेला पेटले. त्यांनी नुरा कुस्तीच्या ऐवजी भाजपशी खरी कुस्ती खेळायचा प्रयत्न केला. ते भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अंगावर गेले अजित पवार स्वतःला फार मोठे वस्ताद समजत होते म्हणून त्यांनी मी महेश लांडगे यांना घुटना डावावर पराभूत करेन, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात महेश लांडगे यांनीच अजित पवारांना पराभूत करून दाखविले. यासाठी महेश लांडगे यांच्या बावन मध्ये देवा भाऊंनी व्यवस्थित “बळ” भरले होते.
– AIMIM पेक्षा शरद पवारांची अवस्था बिकट
आत्तापर्यंत शरद पवार कुठल्याही पक्षाशी आघाडी करून किंवा विरोध करून त्याला संपवतात, असा आरोप त्यांच्यावर होत राहिला होता, पण महापालिका निवडणुकांमध्ये मात्र भाजपने अजितदादांना सत्तेच्या वळचणीला घेऊन सुद्धा त्यांच्या पक्षाला मोठा धक्का दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर एवढी बिकट झाली की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असदुद्दीन ओवैसी यांच्या ए आय एम आय एम पक्षापेक्षाही कमी जागा मिळाल्या. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र अस्तित्व टिकवून नंतर ते गमावल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसले. छत्रपती संभाजी नगर, धुळे, भिवंडी, मालेगाव या महापालिकांमध्ये ए आय एम आय एम पक्षाचे 32 नगरसेवक निवडून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App