नाशिक : मुंबईत ठाकरेंची सत्ता 25 वर्षांनी उखडली; काँग्रेस आणि ठाकरे यांची फारकत एकमेकांनाच नडली!!, असे राजकीय वास्तव चित्र आजच्या एक्झिट पोल मधून समोर आले.Exit polls: Thackeray’s 25-year rule in Mumbai has been uprooted; Congress and Thackeray’s differences have not been resolved by each other
मुंबई महापालिका निवडणुकीतले मतदान संपल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले त्यामध्ये ठाकरेंच्या सत्तेला तिथे सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले कारण मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला 34 ते 37% मते मिळतील, तर भाजपा शिवसेना महायुतीला 42 ते 45 टक्के मते मिळतील असे समोर आले त्याचवेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 13 ते 15 % मते मिळतील तर इतरांना 6 ते आठ % मते मिळाल्याची आकडेवारी एक्झिट पोल मधून समोर आली.
– शिवसेना – भाजपला 121 ते 151 जागा
या मतांच्या टक्केवारीनुसार भाजप – शिवसेना युतीला 121 ते 151 जागा तर ठाकरे बंधूंच्या आघाडीला 62 ते 71 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने दाखविली. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 12 ते 16 जागा तर इतरांना फक्त दहा जागा मिळण्याची शक्यता असल्याचे एक्झिट पोलने नमूद केले.
– ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे वजाबाकीचे राजकारण
या आकडेवारीच्या खेळातून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे ठाकरे बंधूंनी फक्त स्वतःच्या ऐक्यावर भर दिला, पण काँग्रेस सारख्या मुंबईत मुरलेल्या पक्षाला दूर लोटले त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा राज ठाकरे यांचे निमित्त करून ठाकरे बंधूंच्या ताकदीला कमी लेखले. त्यामुळे दोन्ही घटक एकमेकांपासून फारकत घेऊन निवडणूक लढले. त्याचा परिणाम दोन्ही बाजूंच्या मतांच्या टक्केवारीवर झाला. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळवणाऱ्या शिवसेना – भाजप युतीचा फायदा झाला. ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि वंचित स्वतंत्र लढण्याचा त्यांना तोटा झाला. ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी बेरजेच्या राजकारणापेक्षा वजाबाकीचे राजकारण केले. त्यातून दोन्ही घटकांच्या मतांच्या टक्केवारीचा भागाकार झाला. ठाकरे बंधूंना मिळालेली 34 ते 37 %मते आणि काँग्रेस – वंचित आघाडीला मिळालेली 13 ते 15 % यांची बेरीज झाली असती, तर या दोन्ही घटकांना प्रचंड संधी होती. त्यातून जागांच्या आकडेवारीत फार मोठी भर पडली असती, हेच राजकीय वास्तव आजच्या मतदानाच्या आकडेवारीतून समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App