नाशिक : महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. हे कार्यकर्ते आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये राबतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ऐकायचे असते, असे सांगणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्यक्ष कार्यकर्ते त्यांच्या निवडणुकीत म्हणजे महापालिका निवडणुकीत घरीच बसून राहिल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा फारसा कुठे प्रचारच केला नाही. दोन्ही राष्ट्रवादींची सूत्रे अजितदादांच्या हातात राहिली. सुप्रिया सुळे यांनी फक्त त्यांना “मम” म्हटले. त्यापलीकडे एखाद दुसरी पत्रकार परिषद किंवा एखाद दुसरी सभा घेऊन त्यांनी अख्ख्या महापालिका निवडणुकीची बोळवण केली.
पण आज मात्र प्रत्यक्ष मतदान सुरू असताना सगळी मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात टाकली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेणारी वक्तव्ये केली. त्यांचीच री सुप्रिया सुळे यांनी ओढली.
मार्कर पेनने लावलेली बोटावरची शाई पुसली जात आहे. लोक शाई पुसून मतदानाला येत आहेत. निवडणूक आयुक्तांनी नुसता पगार खाल्ला. त्यांनी काम कुठले केले नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. राज ठाकरे यांनी सुद्धा मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला.
– सुप्रिया सुळेंचे आक्षेप
त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मतदानासंदर्भातले काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करून मतदान प्रक्रियेवरच संशय निर्माण केला. मतदान सुरू असताना माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या अतिशय धक्कादायक आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अनेक ठिकाणी बंद पडली आहेत. कोणी मत दिले??, कोणाला मत दिले??, ते प्रत्यक्षात कोणाला गेले??, याचा काहीच कुठे मेळ लागत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. मार्कर पेनने लावलेली शाई हा प्रकार बोगस मतदान वाढवण्यासाठी तर नाही ना??, असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. सशक्त लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने सध्या तसे घडताना दिसत नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
– सुप्रिया सुळे यांची पश्चात बुद्धी
पण हे सगळे सुप्रिया सुळे यांनी पश्चात बुद्धीने केले. कार्यकर्त्यांची म्हणून म्हटलेल्या महापालिका निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि उमेदवारांचा फारसा कुठे प्रचारच केला नाही. त्यांनी एक – दोन ठिकाणी सभा घेतल्या. अजितदादांच्या बरोबर त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाग घेतला. पण पिंपरी चिंचवड मध्ये त्या अजितदादांच्या बरोबर दिसल्या नाहीत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र त्यांना अचानक “जाग” आली. संपूर्ण मतदान प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात टाकल्यावाचून त्या राहिल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App