विशेष प्रतिनिधी
पुणे : Fadnavis महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खदखद व्यक्त केली आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीट सुद्धा काढून देईल. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. मी आधीच सांगितले होते की आमची युती होणार नाही. मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही. अजित पवार माझ्याच वरिष्ठांकडे माझी तक्रार करणार ना. विरोधकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न असेल, पुण्यात अजित पवार आमचे विरोधक होते. पुढे ते म्हणाले, हिंदीतील एक म्हण आहे, ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’. अजून काही झाले नाही, त्यावर इतके बोलणे योग्य नाही. दोन महाननगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. 27 महानगरपालिकेत विरोधात लढत आहेत. त्याच्यावर इतकी चर्चा का करायची? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.Fadnavis
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यनगरी सातत्याने आम्हाला यश देते म्हणून सुरुवात आणि सांगता इथे करतो. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आम्हाला मत देणार अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे कोणी काही बोलले, काही सांगितले तरी मानसिकता बदलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती केली
उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी पुराव्यासहित उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती कशी आणली, ते दाखवले आहे. राज ठाकरेंचे आता बंधूशी पटायला लागले त्यामुळे माझ्याशी बोलण्यापेक्षा बंधुंशी बोलायला पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत. त्यांच्याच सोबत युती करत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेने मला तीन वेळा मुख्यमंत्री बनवले. जनता कोणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीत कळले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मी बसवलेला वाटत असेल तर त्यात हरकत नाही.
उद्धाव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नगरसेवक चोरले
उद्धव ठाकरे यांनी मत चोरीच्या संदर्भात बोलू नये, त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे सगळे नगरसेवक चोरुन नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक त्यांनी चोरायचे हे गंभीर आहे. लाडक्या बहिणीचा हप्त्यावरुन, आता काही लोकांच्या पोटात दुखत आहे. राज ठाकरेंनी इतके आरोप केले आहे की 15 तारखेनंतर त्यांच्याकडून यादी मागवून घेतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App