नाशिक : सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!, असे आज पुणे महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडले.Ajit Pawar rejected NCP unification and Supriya sule’s central ministership
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी निवडणूक एकत्रित लढविली. परंतु, तिच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची छाप राहिली. पण या संपूर्ण निवडणुकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाची चर्चा माध्यमांनी रंगविली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद त्या बदल्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी गट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार. या सगळ्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता आहे, असे चित्र माध्यमांनी निर्माण केले.
– प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ऐक्य फेटाळले
पण महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐक्य फेटाळले. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचेही केंद्रीय मंत्रिपद फेटाळून लावले. सुप्रिया सुळे ज्या पक्षात आहेत, ती शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस INDI आघाडीत आहे. आमची राष्ट्रवादी काँग्रेस NDA मध्ये आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार नाहीत असे अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
– अजितदादांना भीती
पण या सगळ्या मागे अजित पवारांच्या मनातली राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या दुसऱ्या फुटीची भीतीच समोर आली. कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची शक्यता प्रफुल्ल पटेल यांनी आधीच फेटाळून लावली होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या आणि सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या, तर प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट झाला असता. शिवाय खासदार सुनील तटकरे यांना सुद्धा केंद्रातल्या राजकारणात फारसे महत्त्व उरले नसते. राज्यातल्या राजकारणातून धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि अन्य काही नेते “वजा” झाले असते. याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडली असती. त्या फुटीला भाजपने व्यवस्थित प्रोत्साहन दिले असते. हे पुढचे राजकारण लक्षात घेऊनच अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची शक्यता फेटाळून लावली. त्याचवेळी सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्री पदात पाचर मारून ठेवली.
– सुप्रिया सुळेंच्या केंद्रीय मंत्रिपदात पाचर
या खेरीज सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्या असत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक अजितदादांना समांतर असे सत्ता केंद्र प्रस्थापित झाले असते. फुटलेल्या राष्ट्रवादीत सुद्धा अजितदादांची एकहाती सत्ता शिल्लक उरली नसती. ही भीती अजितदादांना वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे एकीकरण आणि सुप्रिया सुळे यांचे केंद्रीय मंत्रीपद एकत्र फेटाळून लावले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App