नाशिक : व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!, असाच प्रकार राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या भाषणानंतर समोर आला.Cartoonist targets Raj Thackeray over Adani issue
– राजकडून अदानी टार्गेट, पण…
ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कची कालची सभा प्रचंड गाजली, पण त्यातही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली. उद्धव ठाकरेंनी आता बाजूला व्हावे. त्यांनी मुंबई महापालिकेची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावीत, अशी सूचना करून जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंना गुगली टाकली. राज ठाकरे यांनी आपल्या डाव्या हाताच्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारीवाला माणूस हे चिन्ह ठेवून गौतम अदानी यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या काळात एकट्या अदानींची कशी प्रगती झाली??, हे भारताचा आणि मुंबईचा नकाशा वापरून “सप्रमाण” दाखविले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत उमटले सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातला.
– व्यंगचित्रकारांनी उडविली खिल्ली
पण त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांच्या भाषणातून व्यंगचित्रकारांना मोठे खाद्य मिळाले. अनेक व्यंगचित्रकारांनी राज ठाकरे यांनी गौतम अदानींच्या कंपन्यांचा फुकट प्रचार केला, अशी चित्रे काढून राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. गौतम अदानी यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्या भेटीचा चपखल वापर व्यंगचित्रकारांनी आपल्या चित्रांमधून केला.
– वेगळ्या “नजरेतून” राज आणि अदानी
व्यंगचित्रकारांनी मोदी आणि शाह यांच्या मांडीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बसविले, पण व्यंगचित्रात त्यांचे प्रतिबिंब अदानींच्या मांडीवर अदानी असेच दिसले. त्यामुळे भाजपला टार्गेट करायला गेलेल्या राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्रकारांनी मात्र एका वेगळ्याच “नजरेने” पाहिले. राज ठाकरे यांनी भाजपला टार्गेट करण्यापेक्षा गौतम अदानी यांच्याच कंपन्यांचा प्रचार केला, हे यातून स्पष्ट झाले.
(व्यंगचित्रकार : सुमंत बिवलकर आणि आलोक)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App