विशेष प्रतिनिधी
मुंबई : BMC Election 2026 मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.BMC Election 2026
निवडणूक कर्तव्यात टाळाटाळ करणाऱ्या एकूण ६ हजार ८७१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी २ हजार ३५० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत पुन्हा सहभागी झाले आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षणास आणि प्रत्यक्ष कामावर हजर न राहणाऱ्या उर्वरित ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांविरुद्ध आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.BMC Election 2026
या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश
या कारवाईच्या कचाट्यात केवळ महापालिकेचेच नव्हे, तर राष्ट्रीयीकृत बँका, बेस्ट, बीएसएनएल, रेल्वे, एमटीएनएल, म्हाडा, एलआयसी, टपाल खाते आणि आरसीएफ यांसारख्या विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गुन्हा नोंदवणे, दंड आकारणे आणि विभागीय कारवाई यांचा समावेश असेल.
मुंबईत १ कोटींवर मतदार
मुंबईत सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार मतदारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मोठ्या प्रक्रियेसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासन कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App