नाशिक : प्रखर हिंदुत्व ते हिंदू – मुस्लिम वादाला घाबरणारा पक्ष; ठाकरेंच्या शिवसेनेचे हरवून गेले लक्ष्य!!, शिवसेनेची अशीच अवस्था मुंबईतून समोर आले.
मुंबई महापालिकेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला सांगितले. त्यासाठी एक हजार रुपयांचे चॅलेंज दिले. त्यावर ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर भर देत निवडणूक लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज केले. तुम्ही हिंदू – मुस्लिम वाद सोडून अन्य मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा आणि माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन जा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले. उद्धव ठाकरेंचे एक लाख रुपये आणि त्यात माझ्या 10 लाख रुपयांची भर घालून मी देवेंद्र फडणवीस यांना 11 लाख रुपये द्यायला तयार आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या बाता न मारता हिंदू – मुस्लिम वादाच्या पलीकडे जाऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे मीच त्यांना चॅलेंज देतो, असे संजय राऊत म्हणाले.
– बाळासाहेबांचे निवडणुकीपेक्षा हिंदुत्वाला महत्व
फडणवीस आणि ठाकरे या वादातून लोकांची करमणूक झाली, तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे प्रखर हिंदुत्व ते हिंदू – मुस्लिम वादाला घाबरणारा पक्ष!!, असा शिवसेनेचा प्रवास झालाय. बाळासाहेब ठाकरे हयात असताना तेल लावत गेल्या. निवडणुका आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, असे ते स्वतः आणि शिवसेनेतले सगळे नेते म्हणत असत. हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत नसण्याचा तो काळ होता, तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सोडायला तयार नव्हते. त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घट्ट धरून ठेवला आणि नंतर कितीतरी वर्षांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळायला लागली. त्यावेळी शिवसेनेला सत्तेचे दिवस दिसले. त्यात भाजप सुद्धा लाभार्थी ठरला.
आज भाजपने निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा डंका वाजविला, पण त्याची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांनी केली हे नाकारण्यात मतलब नाही. भाजपच्या नेत्यांनी ते कितीही नाकारले म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही.
– ठाकरेंनी हिंदुत्वाचा ढोल मोठा वाजविला असता, पण…
पण त्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला. तो सोडून देताना वेगवेगळी कारणे दिली, तरी शिवसेनेपासून हिंदुत्वाचा मुद्दा दूर गेला किंबहुना ठाकरेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेली ही वस्तुस्थितीच यानिमित्ताने समोर आली. अन्यथा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदू – मुस्लिम वादाला घाबरून तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे सोडून द्या. इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवा, असे सांगितलेच नसते. उलट त्यांनी भाजप हिंदुत्वाचे ढोल वाजवतोय ना मग आपण त्यांच्या ढोलापुढे आणखी मोठा ढोल वाजवू, अशी भूमिका घेऊन प्रत्यक्षात तसे करून दाखविले असते. पण तसे न करता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच हिंदू – मुस्लिम वादाच्या पेक्षा इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवायचे चॅलेंज केले आणि स्वतःचे मौल्यवान असलेले हिंदुत्व गमावले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App