चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा त्यांना बारामती सुधारवता आली नव्हती आणि हे म्हणतात त्यांनीच pcmc सुधरवली!!

Mahesh Landge

– सोशल मीडियातून महेश लांडगे यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रात आपण मोठा विकास केला, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व आमदार महेश लांडगे यांना टार्गेट केले. महेश लांडगे यांनी अजित पवारांना जाहीर सभांमधून प्रत्युत्तर दिले त्याचबरोबर त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून अजित पवारांच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल केली. Mahesh Landge

– महेश लांडगे यांची सोशल मीडिया पोस्ट अशी :

PCMC सुधारली ती तिच्या भौगोलिक अस्तित्वा मूळे…

काँग्रेस मधून हाकलून दिल्या नंतर ज्याच्याकडे पैसा, मसल पॉवर असे राजकारणी गोळा करून जातीयवादी पक्ष स्थापन केला. कास्टवादीच्या जातीवादी पवार कुटुंबानी PCMC मध्ये कधी हीं स्थानिक नेतृत्व मोठं होऊ दिलं नाही. जाती जातींमध्ये द्वेष वाढवणाऱ्या जातीयवादी संघटना ची स्थापना करून महाराष्ट्र भर जातीयवाद पेरला. PCMC पुण्यामध्ये जमिनीच्या माध्यमातून घराघरामध्ये भावकी भावकी मध्ये फूट पाडून स्थानिक पै पाहुण्यांना एकमेकांच्या विरोधात उभे केले. घराघरात गुंठामंत्री तयार केले.

सुरुवातीला महेश लांडगे यांच्यासारखे नवखे तरुण हेरून राजकारणात उभे केले. परंतु लवकरच त्यांना पक्षाचा जातीयवादी चेहरा लक्षात आला. PCMC ला कसं मंत्री पदासाठी डावलले जातं, हे अनेक स्थानिक नेतृत्वानी लागलीच ओळखून घेतले. त्यात काही संपले, तर जगताप, लांडगे यांच्यासारखे काही नेते पवारांना पुरून उरले.



PCMC चं पक्षाध्यक्ष पद वसंतनाना लोंढे यांच्याकडे असताना त्यांना आमदारकीसाठी डावलण्यात आले. त्याचवेळी विलास लांडे यांना हीं नगरसेवक म्हणून अपक्ष उभं रहावं लागले… संपूर्ण पॅनल निवडून आणून लांडे यांनी आपली पकड दाखवली तेव्हा विलास लांडे यांना आमदारकीचं तिकीट दिले.
पुढे दुसरा कोणी उमेदवार भेटतं नाही म्हणून आमच्या भोळ्या भाबड्या विलास लांडे यांना अनेकदा बळीचा बकरा बनवून उमेदवार बनवण्यात आलें.

महेश लांडगे यांना सुद्धा 2014 ला कास्टवादीने तिकीट नाकारले. तसेच इतर पक्षांनी ही तिकीट नाकारले.‌ महेश लांडगे 2014 ला अपक्ष आमदार म्हणून निवडून येऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. स्थानिक नेतृत्वात जगताप असो, वाघीरे असो, लोंढे असो, लांडे असो की लांडगे असो की गव्हाणे असो की अन्य इतर कोणी असो त्यांनी वेळोवेळी स्वतःच राजकारणातील अस्तित्व सिद्ध करून दाखवले.

#Politics_with_Respect हे ब्रीद वाक्य भारतात सर्व प्रथम महेश लांडगे यांनी कार्यकर्ता आणि समाज मनावर कोरले. पक्षीय विरोधकांना, पै पाहुण्यांना उत्तरं देताना भाषेच भान संयम काय असावं याची जाणीव करून दिली आणि त्यामाध्यमातून #vision_2020 चा पाया रचून तो जनमानसात यशस्वी करून दाखवला‌ आणि PCMC ची एक हाती पकड स्थानिक नेतृत्वाकडे घेतली.

आज परस्थिती अशी आहे की #pcmc ला #बाबरमती च्या मतिमंदांची आवश्यकता राहिलेली नाही.भले हीं मग नेतृत्व लांडगे कडे असो की इतर कोणाकडे.
आता जनता सुज्ञ आहे…

Mahesh Landge launches a scathing attack through social media.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात