विशेष प्रतिनिधी
पुणे : Uddhav Thackeray कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आपण आता मुख्यमंत्रिपदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.Uddhav Thackeray
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पवार यांनी ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी नोटीसा बजावूनही ते सादर केले नाही. त्यामुळे अटक वॉरंट का जारी करू नये, अशी नोटीस आता आयोगाने ठाकरे यांना बजावली होती. तसेच ठाकरे यांनी याबाबत व्यक्तिशः: किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहावे, असे नोटिसीमध्ये नमूद आहे.Uddhav Thackeray
त्यानंतर ठाकरे यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फेत प्रतिज्ञापत्र सादर केले.वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार, २४ जानेवारी २०२० ला पवार यांनी ठाकरे यांना एक दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात भीमा-कोरेगाव दंगल हा तत्कालीन फडणवीस सरकारचा कट असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
प्रशासकीय गोपनीयता आणि तांत्रिक अडचण
शासकीय नियमांनुसार, मुख्यमंत्री कार्यालयात येणारी पत्रे ‘इनवर्ड’ नोंदणीसह जतन होतात. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात याच तांत्रिक बाबीचा आधार घेत चेंडू विद्यमान सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App