Imtiaz Jaleel’ : तिकीट कापल्याने नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला

Imtiaz Jaleel'

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Imtiaz Jaleel छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.Imtiaz Jaleel

मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांच्या वाहनावर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही वेळातच मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Imtiaz Jaleel



गुंडाला मंत्र्यांचे संरक्षण-जलील

दरम्यान, या प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांनी पोलिसांसमोर हा हल्ला झाला असून पोलिस काय कारवाई करतात? ते आता पाहणार असल्याचे म्हटले आहे. हल्ला करणाऱ्या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे सक्षण असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. पक्षांतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हल्ल्यामागे नेमके कोण?

इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांनी पाळलेल्या गुंडाने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यामागे कलीम कुरेशी हे असल्याचा आरोप होतोय. कलीम हे शिरसाट आणि सावे यांच्या सांगण्यावरून काम करतात. त्याबदल्यात कलमी कुरेशी यांच्या अवैध धंद्यांना सत्ताधाऱ्याचे संरक्षण मिळते, असा आरोपही जलील यांनी केलाय. कलीम कुरेशी पूर्वी एमआयएममध्ये होते. मात्र, इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद झाल्याने त्यांनी पक्ष सोडला. कलीम कुरेश हे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित, तर प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसमधून निवडणुकीसाठी उभे आहेत.

धावत्या वाहनातून बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न

प्रचार रॅलीदरम्यान बायजीपुरा-जिन्सी परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाराज कार्यकर्त्यांच्या एका गटाने इम्तियाज जलील यांच्या धावत्या वाहनाचा पाठलाग करत त्यांना बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेपूर्वी काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला होता. परिस्थिती चिघळत चालल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवण्यात आला

या घटनेवेळी इम्तियाज जलील हे वाहनाच्या पुढील सीटवर बसले होते, तर त्यांच्या गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सुदैवाने, इम्तियाज जलील यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. मात्र, धावत्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरात कडक नजर ठेवण्यात येत आहे.

22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी

विशेष म्हणजे हा हल्ला बाहेरील विरोधकांकडून नव्हे, तर एमआयएम पक्षातीलच नाराज गटाकडून झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमआयएमने यावेळी संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे पक्षात आधीपासूनच असंतोष होता. अनेक ठिकाणी नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आली होती. या असंतोषाचेच पडसाद आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र बायजीपुरा परिसरात पाहायला मिळाले.

Imtiaz Jaleel’s Vehicle Attacked in Chhatrapati Sambhajinagar; Police Lathi-Charge PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात