विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत.CM Fadnavis
करप्शन आणि कन्फ्यूजनची युती- फडणवीस
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज जो वचननामा आला आहे, त्यात वचनही नाहीये आणि नामाही नाहीये. मला कोणीतरी म्हणालं कार्टूननिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हणालो असं म्हणणं योग्य नाही. मग मला कोणीतरी असं म्हटलं की, कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी त्यांना म्हटलं हे देखील योग्य नाही. कारण कोणाचा व्यवसाय काहीही असू शकतो, ही जी युती झाली आहे ती युती करप्शन आणि कन्फ्यूजची झाल्याची टीकादेखील फडणवीस यांनी केली आहे.CM Fadnavis
खोटं बोलायचं तर वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा?
आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचूननामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांनाही माहिती नाही. याचं कारण आपण बघाल, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनासंदर्भातील एक फॅक्टचेक केला, आणि त्या फॅक्टचेकमध्ये असं दिसलं की यांनी त्यावेळी जे पाच वचनं दिले होते, त्यातील एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही. मला आश्चर्य वाटतं जर आपल्याला खोटंच बोलायचं आहे तर तो वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा?
फडणवीसांची शेरोशायरी
मला असं कळलं की हे जेव्हा वचननामा करायला बसले, तेव्हा ते आपापसात काही तरी बोलत होते. मग मी त्याची माहिती काढली तर ते त्या ठिकाणी काय बोलत असतील?
झुठोने -झुठोसे कहा सच बोलो
अरे भाई दो भाईओ का ऐलान हुआ है सच बोलो,
घर के अंदर झुठो की एक मंडी है
दरवाजे पर लिखा है सच बोलो|
अशी शेरोशायरी करत फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
..याचंही उत्तर आम्हीच द्यायचं का?
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधला. आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी कुठला तरी शो करत होते. राहुल गांधींसारखी स्क्रिन लावली होती, राहुल गांधींसारख्या येरझऱ्या मारत होते, काही तरी बोलत होते, आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी असं म्हटलं, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाहीत. आता हे आम्हाला का विचारता, घरी जाऊन काकांना किंवा बाबांना विचारा. 25 वर्षांमध्ये मुंबईत शौचालय देखील का तयार झाले नाहीत? याचं उत्तर आम्ही द्यायचं, की बाबा आणि काकांनी द्यायचं?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App