Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू व्यक्तीला जमावाने जाळले; धारदार शस्त्रांनी हल्ला, रुग्णालयात दाखल; 15 दिवसांत हिंदूला जाळल्याची दुसरी घटना

वृत्तसंस्था

ढाका :Bangladesh  बांगलादेशात पुन्हा एकदा एका हिंदू व्यक्तीला जाळल्याची घटना समोर आली आहे. शरियतपूर जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी 50 वर्षीय खोकोन दास यांच्यावर जमावाने हल्ला केला. खोकोन दास घरी परतत असतानाच, काही लोकांच्या जमावाने त्यांना घेरले. आधी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला, नंतर त्यांना निर्दयीपणे मारहाण करून पेटवून देण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीररित्या भाजले.Bangladesh

जखमी अवस्थेत खोकोन दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.Bangladesh



15 दिवसांत दुसऱ्या हिंदूला जाळले

बांगलादेशात 15 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा एका हिंदू व्यक्तीला जाळण्यात आले आहे. यापूर्वी 18 डिसेंबर रोजी मैमनसिंह जिल्ह्यात हिंदू युवक दीपू चंद्र दास यांना जमावाने मारहाण करून ठार केले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून आग लावण्यात आली होती.

दीपू दास यांना जमावाने ईशनिंदेचे खोटे आरोप लावून मारहाण केली होती. ते एका कापड कारखान्यात काम करत होते. या प्रकरणाच्या तपासात असे समोर आले की, ज्या दाव्याच्या आधारावर जमावाने हल्ला केला होता, त्याचे कोणतेही पुरावे सापडले नाही.

खरं तर, सोशल मीडियावर असा आरोप केला जात होता की दीपू चंद्र दासने फेसबुकवर अशी टिप्पणी केली होती, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, परंतु तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत अशा कोणत्याही पोस्ट किंवा टिप्पणीचे पुरावे मिळालेले नाहीत.

बांगलादेशात 12 दिवसांत 3 हिंदूंची हत्या

बांगलादेशात १२ दिवसांत ३ हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी दीपू चंद्र यांच्या हत्येनंतर २४ डिसेंबर रोजी जमावाने एका हिंदू तरुणाला मारहाण करून ठार केले होते. ही घटना राजबारी जिल्ह्यातील होसेनडांगा गावात घडली. पोलिसांनुसार, मृताची ओळख २९ वर्षीय अमृत मंडल उर्फ सम्राट अशी झाली.

पोलिसांनी सांगितले की, अमृतला जमावाने खंडणीच्या आरोपावरून मारले. तो होसेनडांगा गावाचाच रहिवासी होता. पोलिसांनी सांगितले की, अमृतविरुद्ध पांगशा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. यात हत्येचा एक गुन्हाही समाविष्ट आहे.

यानंतर २९ डिसेंबर रोजी मैमनसिंग जिल्ह्यात एका कापड कारखान्यात हिंदू कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना भालुका उपजिह्यातील सुलताना स्वेटर्स लिमिटेड फॅक्टरीत घडली.

मृताची ओळख बजेंद्र बिस्वास (४२) अशी झाली आहे, जो कारखान्यात सुरक्षा रक्षक होता.

Mob Attacks Sets Hindu Man Fire Shariatpur Bangladesh PHOTOS VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात