एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला, चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!

Pakistan

नाशिक : एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला; चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!, हे राजकीय वास्तव ढाक्यातल्या एका हँडशेक नंतर समोर आले.A handshake made Pakistan furious, India was reluctant to discuss!!

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ढाक्यात सरकारी असाइनमेंट म्हणून गेले होते. तिथे त्यांची भेट पाकिस्तानचे नॅशनल असेंब्लीचे सभापती अयाज सादिक यांच्याशी झाली. जयशंकर आणि अयाज सादिक यांच्यात औपचारिक हस्तांदोलन झाले. पण या किरकोळ हस्तांदोलनाच्या घटनेमुळे पाकिस्तान हुरळून गेले. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी लगेच भारतासमोर चर्चा पुन्हा सुरू करायचा प्रस्ताव दिला.



https://aninews.in/news/world/asia/desperate-pakistan-attempts-to-amplify-eams-dhaka-handshake-pitches-for-talks-to-prevent-any-escalation20260101100133/

वास्तविक पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या घटना घडामोडी, भारताने यशस्वी केलेले operation sindoor या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव कायम वाढता राहिला. भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानची मोठी गोची झाली. ऑपरेशन सिंदूर पेक्षा सिंधू जलकरार स्थगित झाल्याचा परिणाम पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर जास्त झाला. कारण त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक नाड्या आवळल्या गेल्या. अमेरिका आणि चीन यांनी राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला कितीही पाठिंबा दिला तरी सिंधू जलकाराराच्या मुद्द्यावर हे दोन्ही देश भारतावर कुठलाही दबाव आणू शकले नाही किंवा त्यांचा कुठलाही दबाव परिणामकारक ठरला नाही.

– ट्रम्पचे निमंत्रण धुडकावले

त्यामुळे पाकिस्तानला पोहोचलेली आणि पोहोचणारी हानी रोखण्यात चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश यशस्वी ठरले नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला बडा खाना दिला. त्या बड्या खान्यात सामील होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले, पण मोदींनी ते परस्पर धुडकावून लावले. मोदी त्या बड्या खान्यात सामील झाले नाहीत.

– भारतीय क्रिकेटपटूंचा तडाखा

याच दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांच्या मधले वेगवेगळे एपिसोड गाजले पाकिस्तानचा अंतर्गत सुरक्षा मंत्री आणि आशियाई क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष मोहसीन नक्वी याने स्वतःच्याच हस्ते भारताला आशिया करंडक द्यायचा प्रयत्न केला, पण भारताने तो हाणून पाडला. भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणे टाळले. पाकिस्तानने जंग जंग पछाडून सुद्धा कुठला पाकिस्तानी भारतीय व्यक्तीशी हस्तांदोलन करू शकला नव्हता.

– हस्तांदोलन तर किरकोळ

पण ढाक्यामध्ये जयशंकर यांनी अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. त्याबरोबर पाकिस्तान हुरळून गेला. भारत आता आपल्याशी चर्चा करायला तयार होईल असे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी ताबडतोब भारताकडे चर्चा सुरू करायचा प्रस्ताव दिला त्यामुळे सिंधू जल करार आणि बाकीच्या मुद्द्यांवरून येणारा तणाव दूर करण्याचे स्वप्न पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी पाहिले पण भारताने त्यावर कुठलाही शब्द न देता किरकोळ हस्तांदोलनाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष केले.

A handshake made Pakistan furious, India was reluctant to discuss!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात