विशेष प्रतिनिधी
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 61 व्या वर्षी रक्तदान करून 2026 या वर्षाची सुरुवात केली. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेल्या “मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर” या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी रक्तदान केले. हा रक्तदान शिबिराचा उपक्रम बरीच वर्षे सुरू असून त्यात एकनाथ शिंदे नेहमीच रक्तदान करतात. परंतु वयाच्या 61 व्या वर्षात सुद्धा त्यांनी आपला फिटनेस टिकविला असून वैद्यकीय निकष पूर्ण करत त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना रक्तदान केले.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा संदेश याद्वारे तरुणाईला घालून देण्यात आला होता, धर्मवीरांचा तोच वारसा आजही शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे याप्रसंगी नमूद केले. यावेळी वर्षानुवर्ष या उपक्रमात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना तसेच डॉक्टरांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नवीन वर्षात पाऊल ठेवतानाच आपल्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नाशिक ते अक्कलकोट या सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी देऊन महाराष्ट्राला नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. या दोन्ही कारणांसाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विशेष आभार मानले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या वर्षभरात शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून वर्षभर अनेक आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी जाहीर केले.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रवक्ते राहुल लोंढे, बाळा गवस तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि रक्तदाते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App