विशेष प्रतिनिधी
पुणे : गुंडांच्या घरात अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी पण सचिन खरात वर ढकलली जबाबदारी!!, असला प्रकार पुण्यातून आज समोर आला. Ajit Pawar
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यातला कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घरातल्या दोन महिलांना उमेदवारी दिली. दोन प्रभागांमधून त्यांना तिकीटे दिली. त्याचबरोबर गुंड गजा मारणेच्या पत्नीला देखील उमेदवारी दिली. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा दोन ठिकाणी तसेच घडवून आणले. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सगळीकडून जोरदार टीकेची झोड उठली.
कसेही करून अजितदादांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांची निवडणूक जिंकायची आहे म्हणून अजितदादांनी गुंड – पुंडांच्या घरात उमेदवारी दिल्या, असे टीकास्त्र सगळे कडून सुटले. त्यामुळे अजितदादा अडचणीत आले.
पण या सगळ्या गोष्टींवर अजितदादांनी अजब स्पष्टीकरण दिले. आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सचिन खरात यांच्या रिपब्लिकन पार्टीशी आघाडी केली. ती आघाडी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील कायम आहे. त्यांना आम्ही काही जागा सोडल्या. त्यातून त्यांनी काही उमेदवार दिलेत, असा दावा अजित पवारांनी केला, पण सगळ्या गुंडांच्या घरात दिलेल्या उमेदवारांचे चिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळच आहे, हे राजकीय सत्य मात्र अजितदादा सोयीने विसरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App