विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mira-Bhayandar मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे.Mira-Bhayandar
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे.Mira-Bhayandar
नाराजी आणि बंडखोरीने ग्रासलेल्या भाजप पुढे खरे आव्हान काय??
नेमके प्रकरण काय?
कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा-भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौरपदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता, हा समाज निर्णायक ठरू शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौरपदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्राबाबत अंदाज
कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट होते.
मनसेचे प्रत्युत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव म्हणाले की, ‘मुंबई तोडायचा यांचा घाट आहे. उत्तर भारतीयांना जास्तीची तिकीटे द्यायची, त्यांची संख्या वाढवायची त्यानंतर मुंबई तोडायचा यांचा घाट आहे. मुंबईत परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का यांना वाढवायचा आहे. त्यानंतर त्यांना महापौर पदावर दावा करायचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे यांचे प्लानिंग आहे. कृपाशंकर सिंहांना मी एवढेच सांगेन मुंबईचा महापौर मराठीच होईल. उत्तर भारतीय महापौर नाही झाला, तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेत्याच्या तोंडून बोलायला लावून सतत मराठी माणसांचा अपमान करते आहे. यांचे काय करायचे, याचा विचार मराठी माणसांनी केला पाहिजे.’
निवडणूक रणनीतीचा भाग
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि विविध समाजघटकांवर असलेली पकड लक्षात घेता, सिंह यांचे विधान केवळ राजकीय घोषणा नसून निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाची भावना देण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचे चित्र दिसून येत आहे.
आरोप-प्रत्यारोप सुरू
दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत उत्तर भारतीय महापौराचा दावा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीची ही भूमिका प्रत्यक्ष निवडणुकांत कितपत प्रभावी ठरते, आणि उत्तर भारतीय मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या वक्तव्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App