BMC Elections 2026: मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप- ‘आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?’ मातोश्री’बाहेर व्यक्त केली नाराजी

BMC Elections 2026

विशेष प्रतिनिधी

मुंबई : BMC Elections 2026 मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्यानंतरही आज नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे आज मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.BMC Elections 2026

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक 202 मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली आहे. श्रद्धा जाधव यांनी आपला मुलगा पवन जाधव याला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी सोमवारी मातोश्रीत ठाण मांडले. पण उद्धव ठाकरे यांनी पवनच्या जागी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ केली. पण आता श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या भागातील शिवसैनिक प्रचंड संतापल्याचे चित्र आहे.BMC Elections 2026



स्वतःला, नवऱ्याला, मुलाला, सासऱ्याला तिकीट, मग आम्ही जायचे कुठे?

या प्रकरणी एक शाखाप्रमुख आपला रोष व्यक्त करताना म्हणाला, मी सामान्य शिवसैनिक आहे. मागील 36 वर्षांपासून पक्षाचे काम करतो. पण आम्ही फक्त झेंडे लावण्याचेच काम करायचे का? श्रद्धा जाधव शाखेच्या विद्युत बीलही भरत नाहीत. मेन्टेन्सही देत नाहीत. शाखेत पाऊल टाकत नाहीत. त्यांनी अक्षरशः शाखा विकून खाल्ली. सगळे निगेटिव्ह रिपोर्ट दिले. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली. स्वतःला तिकीट, नवऱ्याला तिकीट, मुलाला तिकीट, सासऱ्याला तिकीट, मग आम्ही जायचे कुठे?

उद्धव ठाकरे साहेबांना कळत नाही का?

याच वॉर्डातील अन्य एका महिला शिवसैनिकानेही यावेळी आपला रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या, या बाईला 7 वेळा उमेदवारी दिली गेली. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आमचे आयुष्य शिवसेनेसाठी गेले. आम्ही शिवेसनेसाठी डोकी फोडतो. आमचा जीव जाळतो. पण आमच्यासोबत गद्दारी झाली. आमचा शाखाप्रमुख इतके दिवस काम करतो, पण उद्धव ठाकरे नेहमी श्रद्धा जाधव यांचेच ऐकतात. मग आम्ही आहोत तरी कोण तुमच्या नजरेत? आम्ही कुणीच नाही का? आम्ही पाय जाळतो तेव्हा शिवसेनेचा उमेदवार जिंकून येतो. हे उद्धव ठाकरे साहेबांना कळत नाही का? तुमच्यासाठी श्रद्धा जाधव मोठ्या आहेत, मग आम्ही चिंधी आहोत का?

यावेळी अन्य एका महिला शिवसैनिक म्हणाले, 2017 च्या निवडणुकीत श्रद्धा जाधव निवडून आल्या. त्यावेळी महिलांना साड्या वाटल्या. पण त्याचे 3 लाख रुपये अजून त्यांनी दिले नाही. दागिने गहाण ठेवून मी त्या साड्या विकत घेतल्या होत्या. पण त्या बाईने अजून मला पैसे दिले नाही. गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होते? मी रस्त्यावर बसून वडापाव विकते. काम करणाऱ्या माणसाने काय करायचे? असा सवाल या महिलेने यावेळी उपस्थित केला.

BMC Elections 2026: Rebellion Erupts Outside Matoshree Over Ticket Distribution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात