वृत्तसंस्था
अहमदाबाद : Ahmedabad Sanand Violence अहमदाबादच्या साणंद येथील कालाना गावात मंगळवारी सकाळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. या हिंसाचाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसांनी 40 जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.Ahmedabad Sanand Violence
तरुणाच्या मारहाणीनंतर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, गावात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर एका पोस्टवरून वाद सुरू आहे. यामुळे सोमवारीही एका गटातील तरुणाला दुसऱ्या गटातील तरुणांनी मारहाण केली होती. यानंतर दोन्ही बाजूंनी डझनभर लोक एकमेकांशी भिडले. बघता बघता दोन्ही बाजूंनी लोकांची संख्या वाढली आणि एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू झाली. कशाबशा परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.
मंगळवारी सकाळी पुन्हा भिडले मंगळवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांची अनेक पथके गावात पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात शांतता आहे. पोलीस संशयितांची चौकशी करत आहेत. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App