“पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड; पवारांच्या कोलांट उड्यांचे अदानींच्या डोक्यावर खापर!!; पण किती खरे, किती खोटे??

Sharad Pawar

शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले.Sharad Pawar’s untrustworthy politics, blame it on Adani

शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले. सगळे पवार कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी हजर राहिले. त्यामुळे पवारांनी पोसलेल्या “पवार बुद्धीच्या” पुरोगामी पत्रकारांचे पुरते डोके फिरले. त्यांनी दणादण व्हिडिओ करून पवारांना झापले. पण त्यामुळे पवारांच्या राजकीय कृतीत कुठला केसभरही फरक पडला नाही. “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी पवारांच्या सगळ्या कोलांट उड्यांचे खापर गौतम अदानींच्या डोक्यावर फोडले. जणू काही गौतम अदानी आणि बोले आणि पवार डोले!!, असेच पवार संपूर्ण राजकीय हयातीत वागत राहिले, असे चित्र पवार विरोधकांनी नव्हे, तर “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी निर्माण केले.


पण ही वास्तविकता होती आणि आहे का??, याचा साधा विचार सुद्धा “पवार बुद्धीच्या” पत्रकारांच्या मनात आला नाही. पवार राजकीय दृष्ट्या विश्वासार्ह नाहीत. किंबहुना पवार पूर्णतः अविश्वासार्ह आहेत, म्हणून तर ते दिल्ली पासून मुंबईच्या राजकारणापर्यंत अपयशी ठरले. दिल्लीतल्या राजकारणात सर्वोच्च पद मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरला. महाराष्ट्रातले राजकारण आपल्या हव्या त्या वळणाने चालले नाही म्हणून वेगवेगळ्या “पुरोगामी घटकांना” “हवा” देऊन ते जातीय वळणावर आणून ठेवले. त्यांनी मनोज जरांगे यांना “हवा” दिली. राजकीय इंधन पुरविले. मराठा राजकारण पेटवून ठेवले. पण ते त्यांच्यावरच उलटले. कारण महाराष्ट्राच्या जनतेने मनोज जरांगेकृत मराठा राजकारणाला “हवा” दिली नाही. पर्यायाने पवारांनाच किंमत ठेवली नाही, हे राजकीय वास्तव “पवार बुद्धीच्या” पत्रकारांना दिसले नाही. त्यांना पवारांचे पुरोगामीत्व खरे वाटले होते. कारण “पवार बुद्धीचे” पत्रकार त्या पुरोगामीत्वाचे लाभार्थी होते.

– काँग्रेसच्या नेत्यांनी बरोबर ओळखले

पण शरद पवार राजकीय दृष्ट्या विश्वासार्ह नाहीत. ते नेहमीच विश्वासघात करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांनी जेवढे ओळखले, तेवढे कुणीच, अगदी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा ओळखले नाही. काँग्रेसच्या नेत्यांना डिवचण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पवारांचा वापर केला. त्या उलट काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांना कायम उंबरठ्याबाहेर ठेवले.

– हवाला सुद्धा विश्वासावर चालतो

नरसिंह राव पंतप्रधान असताना जैन हवाला कांड खूप गाजले होते. जैन नावाच्या उद्योगपतीच्या डायरीत काही नेत्यांची नावे आणि त्यांच्या नावापुढे आकडे असे लिहिले होते. या नेत्यांनी भ्रष्टाचार करून, मंत्रिपदाचा गैरवापर करून काही उद्योजकांना लाभ मिळवून दिल्याचे त्यातून सूचित करण्यात आले होते. त्या जैन हवाला डायरीत माधवराव सिंधिया, लालकृष्ण अडवाणी विद्याचरण शुक्ल, शरद यादव, देवीलाल, बलराम जाखड आदी नेत्यांची नावे होती. ही नावे प्रसिद्ध झाल्याबरोबर लालकृष्ण अडवाणींनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता त्यामुळे नरसिंह रावांना आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कायम ठेवणे अवघड झाले होते.

– विठ्ठलराव गाडगीळांची चपराक

पण या जैन हवाला डायरीत शरद पवारांचे नाव नव्हते. त्यावेळी विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेसचे प्रवक्ते होते. पत्रकारांनी त्यांना शरद पवारांचे नाव का नाही??, यासंदर्भात नेमका प्रश्न विचारला होता. त्यावेळी विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले होते, हवाला व्यवहारा संदर्भात मला फारसे काही माहिती नाही, पण मला एवढेच माहिती आहे, की कुठलाही हवाला व्यवहार हा एकमेकांच्या विश्वासावर चालतो!! विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे उद्गार शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरचे सगळ्यांत ठळक प्रश्नचिन्ह म्हणून गाजले होते. हवाला व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा शरद पवार विश्वासार्ह वाटत नाहीत. विठ्ठलराव गाडगीळांनी ही सणसणीत हाणली होती. पण “पवार बुद्धीच्या” पत्रकारांना यातली खोच लक्षात आली नव्हती आणि आजही लक्षात आली नाही.

– त्यावेळी गौतम अदानी नव्हते

शरद पवारांनी आत्तापर्यंत मारलेल्या कोलांट्याउड्या या त्यांच्या अविश्वासार्ह स्वभावाच्या ठळक खुणा आहेत. खऱ्या चिकित्सक बुद्धीने पाहिल्या, तर त्या सहज दिसू शकतात, पण “पवार बुद्धीचा” चष्मा डोळ्यांवर लावला की त्या अविश्वासार्हतेतच मुत्सद्देगिरी, “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी खेळी केली”, असले युक्तिवाद सुचायला लागतात. वास्तविक पवारांनी टाकलेले डाव आणि पवारांच्या खेळ्या हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुणाच्या ना कुणाच्यातरी पाठीत खंजीर खुपसणे असते.

– 1978 मध्ये त्यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री पद पटकावले. त्यावेळी गौतम अदानी “मध्ये” नव्हते.

– 1991 मध्ये शरद पवार पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये होते. नरसिंह राव यांच्या विरोधात ते हरले. त्यावेळी गौतम अदानी यांनी कुठलीही “भूमिका” त्यात पार पाडली नव्हती.

– शरद पवार हे सीताराम केसरी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरले. सीताराम केसरी यांना 6 हजार 224 पेक्षा मते मिळाली आणि शरद पवार फक्त 882 मते मिळवू शकले. पण त्या निवडणुकीत सुद्धा गौतम अदानी यांनी कुठलीही “लुडबुड” केलेली नव्हती.

– “राष्ट्रीय” नेत्याला “स्थानिक” मदत

– 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गौतम अदानी शरद पवारांना भेटले त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता.

– 2022 मध्ये गौतम अदानी शरद पवारांना भेटले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले‌.

– 2025 मध्ये गौतम अदानी शरद पवारांना भेटले. त्यानंतर पवार काका पुतणे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकत्र निवडणूक लढवायला कबूल झाले.

हे सगळे युक्तिवाद “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी केलेत. याचा अर्थ पवारांसारख्या तथाकथित “राष्ट्रीय” नेत्याला “स्थानिक” राजकारणात गौतम अदानी यांनी मदत केली, याचीच कबुली “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी दिली. मग हेच पत्रकार पवारांचा फार मोठे “चाणक्य”, “फार मोठी खेळी करणारे नेते”, “फार मोठा डाव टाकणारे नेते” असे वर्णन आत्तापर्यंत का करत राहिले होते??, हे सवाल कुणी पत्रकारांना विचारले नाहीत म्हणून ते गैरलागू ठरत नाहीत. उलट ते जास्त लागू ठरतात. कारण पवार हे राजकीय कर्तृत्वाने तोकडे आणि उपप्रादेशिक नेते आहेत हेच वास्तव त्यांच्या राजकीय आयुष्याच्या अखेरीस समोर आलेय. फक्त ते “पवार बुद्धीच्या” पत्रकारांना पचायला जड जातेय.

Sharad Pawar’s untrustworthy politics, blame it on Adani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात