विशेष प्रतिनिधी
नागपूर : माओवाद्यांशी लढण्यासाठी फडणवीस सरकारने पोलिसांना बळ दिले. गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला 30 स्कॉर्पिओ वाहने, 2 बस आणि 2 मोटारसायकल असा एकूण 34 वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.Police in Gadchiroli strengthened to fight Maoists; 34 new vehicles for the police force!!
या आधुनिक आणि वेगवान वाहनांमुळे दुर्गम आणि आदिवासी भागात जलद गस्त, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद, माओवादविरोधी मोहिमा, तसेच दैनंदिन पोलीस कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे. स्कॉर्पिओ वाहने गस्त आणि ऑपरेशनल कामांसाठी उपयुक्त ठरणार असून, बस वाहनांचा उपयोग पोलीस पथकांच्या वाहतुकीसाठी तसेच विशेष मोहिमांसाठी होणार आहे; तर मोटारसायकलींमुळे अरुंद व दुर्गम मार्गांवरही पोलीस उपस्थिती वाढण्यास मदत मिळणार आहे.
यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलासाठीच्या नूतन वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाचे भूमिपूजन केले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App