विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : Shinde Sena कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.Shinde Sena
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना १९८३ साली झाली आणि तेव्हापासून जवळपास ४० वर्षे या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे, तीच परंपरा आपल्याला यापुढेही अबाधित ठेवायची असल्याचे आवाहन याप्रसंगी केले. भारतीय जनता पक्षासोबत आपली वैचारिक युती असून युतीमध्येच आपल्याला ही निवडणूक लढायची असल्याचे सांगितले. कल्याण डोंबिवलीकरांनी कायमच महायुतीला भक्कम साथ दिली असून यावेळी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी महायुतीलाच प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.Shinde Sena
गेल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात या कल्याण डोंबिवलीमधील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत, यात डोंबिवलीमध्ये तयार होत असलेले संत सावळाराम क्रीडा संकुल, सुतिका गृहाच्या जागेवर तयार होत असलेले कॅन्सर हॉस्पिटल, शहरात सर्वत्र काँक्रीटचे रस्ते, समाज मंदिरे तसेच कल्याण शीळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, कल्याण रिंग रोड, मेट्रो – १२ शिळफाटा येथील सहापदरी उड्डाणपूल, पलावा उड्डाणपूल, पत्री पूल लोकग्राम पूल अशी अनेक कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी काळात विकासाचा असाच वेग कायम ठेवून शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीला संधी द्यावी, असे ते म्हणाले.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जीतेन पाटील, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, रवी पाटील, विवेक खामकर, विकास म्हात्रे, तात्या गंभीरराव, नितीन पाटील, अर्जुन पाटील, बंडू पाटील, एकनाथमामा पाटील, विश्वनाथ दुबे, पंढरी पाटील, जनार्दन म्हात्रे, संतोष चव्हाण, कविता गावंड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि डोंबिवली विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App