विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांनी छोट्या पक्षांशी देखील वाटाघाटी सुरू ठेवल्यात. कारण भाजपशी वाटाघाटी करताना काही अडचणी आल्या किंवा अगदीच महायुती तुटायची वेळ आली तर शिवसेना अडचणीत सापडायला नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी सावधपणे छोट्या पक्षांची मोट बांधली आहे.
या पार्श्वभूमीवरच शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला संपूर्ण सहकार्य करण्यासोबतच, रिपब्लिकन सेनेला उचित प्रतिनिधित्व देण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला काही जागा सोडायला तयार असल्याचे स्पष्ट झाले.
या बैठकीला आनंदराज आंबेडकर यांचे पुत्र ॲड. अमन आंबेडकर, खासदार मिलिंद देवरा, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजप जर वेगवेगळ्या घटकांना आपल्याशी जोडून घेत असेल, तर आपणही त्यात मागे नाही हे एकनाथ शिंदे यांनी या बैठकीच्या निमित्ताने दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App