विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.Winning elections does not depend on alliances or fronts; it depends on the strength of workers; Prakash Ambedkar’s mantra for the deprived
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
– कार्यकर्त्यांनो, तुमचं जिंकण हे युती किंवा आघाडीवर अवलंबून नाही, तर तुमचं जिंकण हे तुमच्या ताकदीवर अवलंबून आहे.
– युती झाली नाही, तरी आपण जिंकू शकतो ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे.
– मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणेलच ही मानसिकता निर्माण करा.
– देशात फक्त धर्माचे राजकारण नाही, तर धर्माच्या नावाखाली पुरोगामी विचार, त्या विचाराच्या लोकांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. हे कारस्थान आपल्याला ओळखता आले नाही, तर आपण त्याला बळी पडू.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App