विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे माजी महापौर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहा तास चर्चा केली. त्यांचे मन वळवायचा प्रयत्न केला, पण त्यात सुप्रिया सुळे यांना अपयश आले. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. अजित पवारांना असलेला विरोध कायम ठेवला.Supriya sule failed to convince Prashant jagtap
पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र आघाडी करून निवडणूक लढविण्याची बातमी आल्याबरोबर प्रशांत जगताप यांनी त्याला विरोध केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा विरोध चर्चा केली होती. दोन्हीकडून एकत्र येण्यासाठी अनुकूल भूमिका तयार झाली.
या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी सुद्धा आपली भूमिका ठाम ठेवली. पण याच दरम्यान सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रशांत जगताप यांचे मन वळवायचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी तर प्रशांत जगताप यांच्याबरोबर सहा तास चर्चा केली. स्वतः त्यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. पण सहा तास चर्चा करून सुद्धा प्रशांत जगताप यांचे मन वळविण्यात सुप्रिया सुळे यांना अपयश आले. प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. पुणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची घोषणा केली.
पुणे महापालिकेत राजकीय गरजेपोटी पवार काका – पुतणे एक झाले खरे, पवारांच्या पक्षाला स्वतःचा शहराध्यक्ष टिकवून धरण्यात अपयश आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App