नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला भाजपने 129 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा 57 नगराध्यक्ष निवडून आणले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 39 नगराध्यक्ष निवडून आणता आले. त्यापाठोपाठ राज्यातल्या फडणवीस सरकार नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ करायचा निर्णय घेतला.Fadnavis government’s decision; Mayors have the right to membership and vote in municipal councils; What exactly does it mean??
आत्तापर्यंत नगराध्यक्ष जरी लोकांमधून निवडून येत असले, तरी त्यांना नगरपालिकेचे सदस्यत्व नव्हते. त्याचबरोबर नगरपालिकेच्या कुठल्याही बैठकींमध्ये त्यांना मतांचा अधिकार नव्हता. आता नगराध्यक्षपदी निवडून येणाऱ्या नेत्याला नगरपालिकेचे सदस्य तर मिळेलच, त्याचबरोबर नगरपालिकेच्या बैठकीमध्ये मताचा अधिकार सुद्धा मिळेल. त्यासाठी फडणवीस सरकारने नगरपरिषद कायद्यात बदल केला. त्यासाठी अधिसूचना काढायचा निर्णय घेतला.
या एका निर्णयामुळे नगराध्यक्षांचे अधिकार वाढून त्यांचे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात राजकीय महत्त्व सुद्धा वाढणार आहे. नगराध्यक्षांच्या पक्षांना सुद्धा याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहेत. भाजपला भविष्यात महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्या दृष्टीने नगराध्यक्षांना अधिकार मिळाले की त्या अधिकारांचा वापर करून गावागावांमध्ये आपल्याला हवी ते विकासकामे करायची आणि आपला राजकीय प्रभाव वाढविण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
– फडणवीस मंत्रिमंडळाचे निर्णय असे :
– ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)
– राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
– धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)
– महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार मिळणार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App