विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Local Body महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.Maharashtra Local Body
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 207 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना 53 व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागा जिंकत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे 28, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) 7 व शिवसेना ठाकरे गटाचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत. तर इतर समर्थक पक्ष व अन्य यांची संख्या 37 होते.Maharashtra Local Body
पक्षनिहाय आकडेवारी
महायुती – 207
भाजप 117 शिवसेना ( शिंदे) 53 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 37 महाविकास आघाडी – 44
काँग्रेस 28 शिवसेना (ठाकरे गट) 9 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 7
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक… https://t.co/X5jmfpb3M8 — Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक… https://t.co/X5jmfpb3M8
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025
महाराष्ट्राच्या जनतेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मानले आभार
महाराष्ट्र नगर पंचायत व नगर परिषद के चुनाव में महायुति को प्रचंड समर्थन देने के लिए प्रदेश की जनता का आभार। यह विजय मोदी जी के नेतृत्व में NDA की केंद्र व राज्य सरकार के हर वर्ग के कल्याण के विजन पर जनता का आशीर्वाद है। इस जीत पर मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री… — Amit Shah (@AmitShah) December 21, 2025
महाराष्ट्र नगर पंचायत व नगर परिषद के चुनाव में महायुति को प्रचंड समर्थन देने के लिए प्रदेश की जनता का आभार।
यह विजय मोदी जी के नेतृत्व में NDA की केंद्र व राज्य सरकार के हर वर्ग के कल्याण के विजन पर जनता का आशीर्वाद है। इस जीत पर मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री…
— Amit Shah (@AmitShah) December 21, 2025
मी सकारात्मक प्रचार केला- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. सगळ्या सभांमध्ये मी विकासावर मत मागितली. तसेच आम्ही काय विकास करणार आहोत याची ब्ल्यु प्रिंट मांडली आणि याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी आमच्या विकास कामांवर दिलेली पावती आहे. आज देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपबद्दल जी काही सकारात्मकता आहे याचा फायदा आम्हाला झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App