मुंबईत स्वतंत्र, आघाडी इतरत्र; काँग्रेसच्या भूमिकेवरील संशय दूर; ठाकरे बंधूंच्या युतीत पवारांचा खोडा!!

Congress

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र, तर अन्य२८ महापालिकांमध्ये आघाडी करून निवडणूक लढवायला तयार असल्याची भूमिका आज काँग्रेसने मांडली. त्यामुळे ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पासून काँग्रेसने फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र तळ्यात मळ्यात आजही कायम राहिले.Congress to fight independent in mumbai

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांची बैठक घेतली. त्यात सर्व नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या बरोबर आघाडी करायला नकार दिला. तो काँग्रेस हायकमांडने मान्य केला. काँग्रेस मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे चेन्निथला यांनी जाहीर केले. पण त्याचवेळी अन्य महापालिकांमध्ये समविचारी पक्षांशी आघाडी करायची शक्यता कायम ठेवली.



ठाकरे बंधूंच्या युतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खोडा

पण दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खोडा घालायचा डाव टाकला.‌

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी ठाकरे बंधूंनी युती करत जागा वाटपाची चर्चा गंभीर वळणावर आणून ठेवली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लवकरच युतीची जागा वाटपाची अंतिम घोषणा करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. याच दरम्यान ते शरद पवारांच्या भेटीला सुद्धा पोहोचले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आम्ही हातमिळवणी करू. पण पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले तर मात्र आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्वतंत्र लढू, असे संजय राऊत आणि सचिन अहिर यांनी जाहीर केले.

याच दरम्यान, मुंबई महानगर परिक्षेत्रातील कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आदी महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युतीचे जागावाटप जवळपास 90 % पूर्ण केल्याची बातमी समोर आली. यानिमित्ताने ठाकरे बंधूंची युती पक्की झाली.

– ठाकरे बंधूंची युती पक्की होताच पवारांची अडचण

पण याच दरम्यान, मुंबई महापालिकेतल्या 227 जागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 22 जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई शहराध्यक्ष राखी जाधव यांनी तयार केला. तो घेऊन थेट शरद पवारांना भेटायची तयारी त्यांनी चालविली. ठाकरे बंधूंची जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आणि ती विशिष्ट वळणावर आली असताना अचानक राखी जाधव यांनी 22 जागांचा प्रस्ताव पुढे आणून ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खोडा घालायचा डाव टाकला.

– मुंबईत ताकद कमी, तरी खोडा घालायची तयारी

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फारच कमी. त्यातच राष्ट्रवादीतली फूट आणि राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक अजित पवारांकडे गेले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद फारच घटली. अखंड राष्ट्रवादीचे 5 – 7 नगरसेवक निवडून यायचे. आता पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तेवढी सुद्धा उरली नाही. तरीसुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीत लुडबुड करण्यासाठीच त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी 22 जागा मागायचा प्रस्ताव तयार केला. तो फक्त चर्चेच्या पातळीवर न ठेवता, तो माध्यमांमधून पुढे सरकवला. पण त्यामुळेच पवारांचा डाव उघड्यावर आला. या सगळ्या राजकीय खेळीतूनच शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालायचा असल्याचे स्पष्ट झाले.

Congress to fight independent in mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात