नवाब मलिकांचा विषय बाजूला ठेवून महायुतीत शिरकाव करायचा राष्ट्रवादीचा डाव!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी चर्चा करणार नाही असे म्हणणाऱ्या भाजपने काही अंशी भूमिका बदलल्याची चिन्ह दिसत असून नबाब मालिकांच्या विषय बाजूला ठेवून महायुतीचे काम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे समोर आले. Nawab Malik

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याशी महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका संदर्भात चर्चा केली महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीला महायुतीतून एकाकी पाडले, या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरली.

– आशिष शेलार – तटकरे चर्चा

त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आली. त्या पाठोपाठ आज त्यांनी राज्याचे मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही भेट झाल्याचे तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले.

– राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव उघड्यावर

यातून मराठी माध्यमांनी बरेच निष्कर्ष काढले. महायुतीतून एकनाथ शिंदे यांना डच्चू देऊन त्यांच्या ऐवजी मुंबईत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अनेक मराठी माध्यमांनी केला. पण यातूनच नवाब मलिक यांचा विषय बाजूला टाकून महायुतीत शिरकाव करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव उघड्यावर आला. आता या गावाला भाजप बळ देणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्या विषयावर ठाम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The NCP’s plan is to join the grand alliance by setting aside the issue of Nawab Malik!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात