विशेष प्रतिनिधी
बीड : Santosh Deshmukh बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते.Santosh Deshmukh
बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून, सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला. मात्र त्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावे, असा अर्ज न्यायालयात सादर केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.Santosh Deshmukh
विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. विष्णू चाटेचे सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये नाव नाही तसेच या पूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. तर विष्णू चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे. तसेच विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला
सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर, निकम यांनी आपले म्हणणे मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली. याच दरम्यान, जेव्हा न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचे नाव पुकारले, तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला.
पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून जोरदार युक्तिवाद
दुसऱ्या बाजूला, पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. घटनेचे व्हिडिओ आरोपींना आधी दिले जावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चिती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण भावनिक केले जाते’ असा आक्षेपही आरोपींच्या वकिलांनी नोंदवला. यावर सरकारी पक्षाने आजच हे व्हिडिओ फाईल्स आरोपींच्या वकिलांना देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील डेटाबाबत अर्धा तास चाललेल्या चर्चेत, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मूळ डेटा डिलिट केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. या सर्व घडामोडींमुळे अद्याप या प्रकरणात आरोप निश्चिती होऊ शकलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App