विशेष प्रतिनिधी
मुंबई : Hasan Mushrif सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच पाच वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला यावरूनच कळते कॉंग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्षनेता होणार म्हणून बसले होते. मात्र, बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचा खोचक टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.Hasan Mushrif
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, आज कोल्हापूर महापालिका निवडणूक संदर्भात बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरलेला नाही. काल मी आणि प्रकाश आवाडे भेटलो, इचलकरंजीमध्येही 19 नगरसेवक आमचे होते. आता आम्ही किती उमेदवार देणार याची लिस्ट दिली आहे. काल साधक बाधक चर्चा झाली आहे. आमची 25 जागांची मागणी आहे.Hasan Mushrif
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले असून यावरून टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, वर्षभरात दोन मंत्र्यांचा राजीनामा हा पक्षासाठी दुर्दैवी आहे. धनंजय मुंडे कशातही आरोपी नव्हते. मात्र, त्यावेळी एक परसेप्शन तयार झाले आणि त्यातून त्यांचा राजीनामा झाला. माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण ते पक्षात येण्यापूर्वीचे आहे. उच्च न्यायालयात या निकालाला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे.
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार का? असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत देखील काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत देखील काही ठिकाणी एकत्र आघाडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मेळ राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणाचाही आधार राहिलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये बेबनाव तयार झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रत्येक पक्ष वेगळा आधार शोधत आहे.
पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणावर हसन मुश्रीफ म्हणाले, पार्थ पवारांनी कालच माझी खोटी सही केल्याची तक्रार दिली आहे. पवारांना ते करायचे असते तर ते स्वतः आले असते. कारण 99 टक्के भागीदारी त्यांची आहे. हे पक्ष आणि पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणी कितीही टार्गेट करायचा प्रयत्न केला तरी त्याचा फरक पडणार नाही. हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि जवळचा पक्ष आहे. काम करणारा नेता वक्तशीर म्हणून अजितदादांची ख्याती आहे. कोणी कितीही टार्गेट केलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या मनावर अधिराज्य करत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App