विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘ऋषभायन 2’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची नावे ब्राह्मी लिपीत लिहून मांडली होती. तसेच या प्रदर्शनात विविध तीर्थंकरांची वैशिष्ट्ये सांगणारी देखील माहिती होती. Devendra Fadnavis
यावेळी ‘आद्यपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे प्रथम तीर्थंकार चक्रवर्ती सम्राट, सर्वांचे जनक आणि भारतीय सभ्यतेचे आदी शिक्षक, आदिनाथ भगवान ऋषभदेवजी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमन करून उपस्थितांना संबोधित केले.
जगातील लोकांना जेव्हा सभ्यता माहीत नव्हती, तेव्हा भारत देशात विकसित रूपाने सभ्यता नांदत होती हे अधोरेखित करून, ‘ऋषभायन 2’ हा याच सभ्यतेचे प्रतीक असलेला कार्यक्रम आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमातून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान ऋषभदेवजी यांचे विचार मांडले जातात आणि आज येथे प्रकाशित करण्यात आलेले 1111 ग्रंथ हे याचेच उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
भगवान ऋषभदेवजी यांनी पुरुषांसाठी 72 कला आणि स्त्रियांसाठी 64 कला शिकवलेल्या आहेत, त्या कलांना पुनरुज्जीवित करण्याचे काम या कार्यक्रमामार्फत होत आहे. तसेच भगवान ऋषभदेवजी यांचे एक ‘वैश्विक स्तरावर’स्थान निर्माण करण्यात यावे असे जे निवेदन करण्यात आले, त्यासाठी महाराष्ट्र शासन नक्कीच प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, विविध धर्मांचे विद्वान, गुरु व मुनीश्वर व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App