नाशिक : चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटेंना एक न्याय लावून त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्याच्या आधी त्यांची मंत्रिपदाची खाती काढून घेतली. त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही, ही सगळी राजकीय घडामोडी महायुतीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून समोर आली. Ajit Pawar
मग ज्या माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नाशिक मधली चार घरे लाटली, त्यांना एक न्याय लावला, तर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला दुसरा न्याय कसा लावता येईल??, असा गंभीर सवाल सोशल मीडियातून समोर आला.
१९९५ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून १० % मुख्यमंत्री कोट्यातली दोन घरे लाटली. दुसऱ्या दोन लाभार्थ्यांची सुद्धा घरे लाटली. माणिकरावांचे हे प्रकरण न्यायालयात तब्बल 30 वर्षे चालले. शेवटी त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली.५०००० रुपयांचा दंड ठोठावला. त्यांच्या भावाला सुद्धा हीच शिक्षा सुनावली. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आली. कारण न्यायालयाने त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. माणिकराव आजारी पडले. ते लीलावतीत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोकाटेंची खाती काढून अजित पवारांकडे वर्ग केली. शेवटी माणिकरावांना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. या सगळ्या राजकीय गदारोळात कालचा दिवस संपला.
– गंभीर सवाल समोर
पण त्यामुळेच एक गंभीर सवाल समोर आला. चार घरे लाटणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना कारावासाची शिक्षा झाली. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ३० वर्षांपूर्वी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त त्यांना आता भोगावे लागले. मग १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार अडकून देखील त्याच्याविरुद्ध अजून साधा गुन्हाही दाखल झाला नाही. त्याच्या सहीचे पत्र हे पुरावा रूपात सुद्धा समोर आले. पण शितल तेजवानी सारख्या त्याच्या इतर सहकाऱ्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात घातले. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली. पण पार्थ पवारला या गुन्ह्यातून बाजूला काढण्यासाठी वेगवेगळ्या कायदेशीर क्लुप्त्या लढविल्या गेल्या. हा दुटप्पी राजकीय व्यवहार का आणि कशासाठी??, असा सवाल सोशल मीडियातून समोर आला. याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल मीडियात जोरदार ट्रोल झाले.
– अजितदादा राजकीय किंमत कधी चुकविणार??
माणिकराव कोकाटे प्रकरण विशिष्ट वळणावर येऊन स्थगित झाले, पण पार्थ पवार जमीन घोटाळा विशिष्ट वळणावर आला असला, तरी अजून त्या संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्याचबरोबर अजून तरी कुणालाही त्याची राजकीय किंमत चुकवावी लागलेली नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या राजकीय वर्तन व्यवहारावर ठळक प्रश्नचिन्ह उमटले. अजितदादांना राजकीय किंमत कधी चुकवावी लागणार??, असा सवाल अनेकांनी सोशल मीडियावरून केला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उमटले ते निराळेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App