विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bajrang Sonawane, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मीक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी टीका सोनवणे यांनी केली आहे.Bajrang Sonawane,
माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार नाहीत. मी ठामपणे सांगतो, मंत्रिमंडळात त्यांना घेणार नाहीत. त्यांना कोणीही घेणार नाही. वाल्मीक कराडला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना कोणीही मंत्रिमंडळात घेणार नाही, असा टोला सोनवणे यांनी लगावला आहे.Bajrang Sonawane,
धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली, यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, ते त्यांच्या पक्षाला अंधारात ठेऊन, मुंबईला चाललो म्हणून दिल्लीला आले आहेत. ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ते अंधारात ठेवतात. तसेच ते मंत्री होणारच नाहीत, त्यामुळे मी जर तर वर बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगतोय. आता ते महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचे असेल तर अमेरिकेला जावे लागेल, असा खोचक टोला सोनवणे यांनी लगावला.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे आणि अमित शहा यांच्या भेटीवर आक्षेप घेत ट्विट करत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे.
… तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही
पुढे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनको मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. तसेच जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App