वृत्तसंस्था
वॉशिंग्टन डीसी : Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी आणखी 5 देशांवर पूर्णपणे प्रवास बंदी लादली आहे. यासोबतच पॅलेस्टिनींवरही बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्ड्सवर एका अफगाण निर्वासिताने केलेल्या गोळीबारानंतर घेण्यात आला आहे.Trump
यासोबतच इतर 15 देशांवर प्रवेश निर्बंध (कायमस्वरूपी निवास) लादण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी यासाठी एका घोषणापत्रावर स्वाक्षरी केली, ज्यानुसार अमेरिकेत येण्यावर पूर्ण किंवा आंशिक प्रवास बंदी घालणाऱ्या देशांची यादी 39 पर्यंत वाढवण्यात आली आहे.Trump
यापूर्वीच 19 देशांवर प्रवास बंदी किंवा प्रवेश मर्यादा लागू आहेत. यापैकी लाओस आणि सिएरा लिओन या दोन देशांवर आता पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे पूर्ण बंदी असलेल्या देशांची संख्या 7 झाली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, कमकुवत तपासणी प्रणाली आणि व्हिसा ओव्हरस्टेच्या उच्च दरांचा हवाला देऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे नवीन निर्बंध आणि मर्यादा 1 जानेवारीपासून लागू होतील. या घोषणेत कायमस्वरूपी रहिवासी, मुत्सद्दी आणि खेळाडूंना सूट देण्यात आली आहे.
तुर्कमेनिस्तानमधून नॉन-इमिग्रंट व्हिसावरील बंदी हटवली
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App