वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Delhi Air Pollution bदिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शनिवार संध्याकाळपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या स्टेज-IV मधील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने सकाळी येथे GRAP-III चे निर्बंध लागू केले होते. GRAP-IV हवा अत्यंत प्रदूषित (AQI 450 पेक्षा जास्त) झाल्यावर लागू केला जातो. याला ‘सिव्हिअर प्लस’ श्रेणी म्हटले जाते. शनिवारी संध्याकाळी दिल्ली-एनसीआरमधील आनंद विहारमध्ये AQI 488 आणि बवानामध्ये 496 पर्यंत पोहोचला होता.Delhi Air Pollution
दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP चे स्टेज-I, II आणि III चे निर्बंध आधीच लागू आहेत.Delhi Air Pollution
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे उपाय केले जातील.
जनरेटर सेटच्या वापरास बंदी (आपत्कालीन सेवा वगळून) रस्त्यांवर पाण्याचा शिडकावा, अँटी-स्मॉग गनचा वापर उघड्यावर कचरा, पालापाचोळा, शेतातील अवशेष जाळण्यावर पूर्ण बंदी कठोरता आणि देखरेख
नियम मोडल्यास दंड आणि कारवाई प्रदूषण पसरवणाऱ्या कृतींवर २४x७ देखरेख हिवाळ्यात दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाच्या स्थितीनुसार GRAP अंतर्गत निर्बंध चार टप्प्यांत लागू केले जातात. जेव्हा AQI २०१ ते ३०० च्या दरम्यान असतो, तेव्हा पहिल्या टप्प्यातील उपाय लागू होतात. AQI ३०१ ते ४०० च्या दरम्यान राहिल्यास दुसऱ्या टप्प्यातील, ४०१ ते ४५० च्या पातळीवर पोहोचल्यास तिसऱ्या टप्प्यातील आणि AQI ४५० च्या वर गेल्यास चौथ्या टप्प्यातील कठोर निर्बंध लागू केले जातात.
शनिवारी संध्याकाळी स्मॉगचा थर
दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी संध्याकाळी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४८८ आणि बवानामध्ये ४९६ पर्यंत पोहोचला. याला अत्यंत गंभीर मानले जाते. आनंद विहारमध्ये स्मॉगचा (धुके) थर दिसत होता.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, राजधानीतील एकूण निरीक्षण केंद्रांपैकी 21 केंद्रांवर AQI 400 पेक्षा जास्त नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत येतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App