वृत्तसंस्था
तेहरान : Narges Mohammadi इराणमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आणि मानवाधिकार कार्यकर्त्या नरगिस मोहम्मदी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. नरगिस मशहद शहरात कार्यकर्ते खोसरो अलिकोरदी यांच्या शोक सभेत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या, तिथे त्यांना पकडण्यात आले.Narges Mohammadi
अलिकोरदी गेल्या आठवड्यात त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळले होते. इराणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगितले आहे, परंतु यावर शंका व्यक्त केली जात आहे. अलिकोरदी याच्या निषेधार्थ हिजाबशिवाय भाषण देत होत्या. याच दरम्यान सुरक्षा दलांनी त्यांना अटक केली.Narges Mohammadi
नरगिस मोहम्मदी यांचे भाऊ मेहदी, जे त्या कार्यक्रमात उपस्थित होते, त्यांनी त्यांच्या अटकेची पुष्टी केली आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आणि अनेक लोकांना मारहाण केली.
नरगिस मोहम्मदी यांना कुठे ठेवण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोबेल समितीने नरगिस मोहम्मदी यांच्या अटकेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नरगिस मोहम्मदी यांना 2023 मध्ये इराणमधील महिलांवरील दडपशाहीविरुद्धच्या संघर्षासाठी आणि मानवाधिकार पुढे नेण्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
त्या इराणमध्ये फाशीची शिक्षा, सक्तीचा हिजाब आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंधांविरोधात दीर्घकाळापासून आवाज उठवत आहेत. याच कारणामुळे त्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक करण्यात आली आणि तेहरानच्या कुख्यात एविन तुरुंगात ठेवण्यात आले.
तुरुंगात असताना त्यांची प्रकृती अनेकदा बिघडली. समर्थकांच्या मते, त्यांना तुरुंगात अनेकदा हृदयविकाराचा झटका आला आणि 2022 मध्ये त्यांची तातडीची शस्त्रक्रियाही करावी लागली. डिसेंबर 2024 मध्ये त्यांना वैद्यकीय कारणास्तव तीन आठवड्यांसाठी तात्पुरती सुटका देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App