शरद पवारांच्या घरच्या पार्टीत राहुल गांधी + गौतम अदानी सामील; 86 व्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती!!

Sharad Pawar'

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शरद पवारांच्या घरच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी काल रात्री सामील झाले. 86 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांनी आपली सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती केली.Rahul Gandhi + Gautam Adani attend Sharad Pawar’s house party; Creating an image of all-party friendship on his 86th birthday!!...

शरद पवारांचा वाढदिवस 12 डिसेंबरला आहे परंतु त्या दिवशी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये मुंबईत कार्यक्रम आहे. म्हणून शरद पवारांनी काल रात्रीच नवी दिल्लीतल्या 6, जनपथ या निवासस्थानी सर्वपक्षीय खासदारांना पार्टी दिली. या पार्टीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पवन खेडा, कमलनाथ, मनीष तिवारी, मोदी सरकारमधील मंत्री रवणीत सिंग बिट्टू त्याचबरोबर अजित पवार यांच्यासह भाजपचे काही खासदार हजर राहिले. त्यामुळे शरद पवारांची सर्वपक्षीय मैत्री प्रतिमा निर्मिती झाली.



महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांनी दिलेल्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी हे सामील झाले. अर्थात ते दोघे एकमेकांना भेटले की नाही, याविषयी कुणी काही बोलले नाही.

पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी

शरद पवारांची राज्यसभेची मुदत जून 2026 मध्ये संपत असून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतली अखेरची पार्टी दिली, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. त्याचबरोबर शरद पवारांनी मनात आणले, तर ते पुन्हा राज्यसभेत पोहोचतील. कारण त्यासाठी त्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष मदत करतील, अशी पुस्ती सुद्धा त्या बातम्यांना जोडली.

Rahul Gandhi + Gautam Adani attend Sharad Pawar’s house party; Creating an image of all-party friendship on his 86th birthday!!...

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात