विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chandrashekhar Bawankule विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.Chandrashekhar Bawankule
या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. त्यामुळे या विषयावर आमचा अजेंडा आजही कायम आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले.Chandrashekhar Bawankule
नागपुरात आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्याचवेळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची जोरदार मागणी करून सरकारला धारेवर धरले होते. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भाच्या मागणीकडे पुन्हा लक्ष वेधले गेल्याने अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य- विजय वडेट्टीवार
वेगळ्या विदर्भासंदर्भात बोलताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर ‘वेगळा विदर्भ’ हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवारांनी मांडली आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील जनता आणि विविध संघटना वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. मात्र, अनेकदा या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातो. आता खुद्द महसूलमंत्र्यांनीच ‘आम्ही काम करत आहोत’ असे सांगितल्याने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App