वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

नाशिक : वंदे मातरम वरील लोकसभेतल्या चर्चेत नवीन काहीच नाही नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!! या मुद्द्यांभोवतीच सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा केंद्रित ठेवली त्यामुळे वंदे मातरमच्या 150 वर्षांच्या इतिहासाला खऱ्या अर्थाने उजाळा मिळण्याऐवजी राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये ती चर्चा वाहून गेली. Vande Mataram

वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल त्या राष्ट्रीय स्फूर्तीगीतावर लोकसभेत आणि राज्यसभेत खास चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम या गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला कशी आणि किती प्रेरणा दिली, यावर चर्चा होणे अपेक्षित होते. पण लोकसभेतल्या या चर्चेला नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात असेच स्वरूप मिळत गेले.

– पंतप्रधान मोदींचे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेची सुरुवात करताना सकारात्मक केली वंदे मातरम गीताचा सगळा इतिहास सांगितला. या गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला कशा पद्धतीने निर्णायक वळण दिले, याचे बहारदार वर्णन केले, वंदे मातरम मधल्या स्वदेशी तत्त्वाला मोदींनी आजच्या आत्मनिर्भर भारताची जोडले, पण त्यापुढे जाऊन त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना टार्गेट करताना त्यांनी वंदे मातरम गीता संदर्भात मोहम्मद अली जिना यांच्यासमोर झुकून तडजोड केली, असा आरोप केला. त्यामुळे चर्चेला वेगळेच राजकीय वळण लागले.– संघ परिवारावर प्रहार

– नेहरू टार्गेटवर

मोदींच्या पाठोपाठ सत्ताधारी खासदारांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस विशेषतः गांधी परिवार यांना टार्गेट करण्यात धन्यता मानली. निशिकांत दुबे आणि अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला टार्गेट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वंदे मातरम वरील चर्चा पुन्हा ट्रॅक वर आणली. वंदे मातरम गीतामध्ये संपूर्ण देशाचा विचार केलाय. यात हिंदू – मुसलमान किंवा धार्मिक विचार नाही, तर राष्ट्रीय विचार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

परंतु, गौरव गोगोई, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, अरविंद सावंत या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातला नेहरूंवरच्या टीकेचा धागा पकडून संघ परिवारावर तिखट प्रहार केले. मोदींनी भाषण चांगले केले पण त्यांनी मुद्दामून सगळी तथ्य सांगितले नाही रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये वंदे मातरम गीत अधिवेशनात गायले एवढेच सांगितले, पण ते अधिवेशन हिंदू महासभेचे किंवा संघाचे नव्हते, तर ते काँग्रेसचे अधिवेशन होते हे मोदींनी मुद्दामून सांगितले नाही, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

वंदे मातरम गीताने भरून आणि त्यातून प्रेरणा घेऊन काँग्रेस ज्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध लढत होती, त्यावेळी सध्याच्या सरकारचे राजकीय पूर्वज ब्रिटिशांना मदत करत होते. ब्रिटिशांच्या लष्करामध्ये तरुणांना भरती करत होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या गुप्त वार्ता ब्रिटिशांना खबरी स्वरूपात देत होते, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. सध्याच्या सरकारचे राजकीय पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते. त्यांनी 1942 च्या चलेजाव आंदोलनाला विरोध केला होता हा इतिहास मोदींनी मांडला नाही असा आरोप गौरव गोगोई यांनी केला.

त्यामुळे आजची वंदे मातरम वरची सगळी चर्चा ही अशाच आरोप – प्रत्यारोपांमध्ये वाहून गेली. वंदे मातरमच्या इतिहासावर, वर्तमानावर आणि भविष्यावर फारशी कुणी चर्चाच केली नाही.

Attack on Nehru in discussion on Vande Mataram

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात