नाशिक : पश्चिम बंगाल मधले आमदार हुमायून कबीर यांनी सहा डिसेंबरला आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग मध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. पण यातून ममता बॅनर्जींच्या दुटप्पी राजकारणाची नीतीच समोर आली. Mamata banerjee
हुमायून कबीर यांनी बाबरी मशीद मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांग मध्ये बाबरी मशीद बांधणार असल्याची अधिक घोषणा केली होती. त्यामुळे पश्चिम बंगाल मधले राजकारण तापले होते. भाजपने हा मुद्दा जोरदार लावून धरला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हिंदूंची मते गमावण्याच्या भीतीने हुमायून कबीर यांची तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी केली, पण त्यांची आमदारकी मात्र वाचली. त्यांनी आज 6 डिसेंबर रोजी सुमारे 3 लाख लोकांच्या उपस्थितीत बेलडांग मध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली. त्यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल मधल्या राजकारणाचे “रहस्य” अप्रत्यक्षपणे बाहेर काढले.
ममता बॅनर्जी यांनी जरी आपली तृणमूल काँग्रेस मधून हकालपट्टी केली असली, तरी पोलिसांनी मात्र आपल्याला चांगले सहकार्य केले. त्यामुळे बेलडांग मध्ये बाबरी मशिदीचा पायाभरणी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकला, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. या पायाभरणीच्या कार्यक्रमाला हुमायून कबीर यांनी सौदी अरेबियातून दोन मौलवींना आणले होते. पश्चिम बंगाल सरकारने त्यांची सुद्धा चांगली सोय केली होती. त्यांना सरकारी वाहनातून कोलकत्या पासून बेलडांग पर्यंत नेले होते.
– मुस्लिम बहुल जिल्हा हे वैशिष्ट्य
बाबरी मशिदीच्या पायाभरणीच्या या कार्यक्रमातून बॅनर्जी यांची दुटप्पी राजनीती समोर आली. पश्चिम बंगाल मधला मुर्शिदाबाद जिल्हा हा मुस्लिम बहुल आहे. तिथे तब्बल 66.7% मुसलमान समाज आहे. उरलेल्या समाज हिंदू आणि ख्रिश्चन आहे. मुर्शिदाबाद विभागात विधानसभेचे 22 मतदार संघ येतात. या सर्वच्या सर्व 22 मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाज बहुसंख्यांक आहे. त्यामुळे त्यांची मते मिळविणे ही ममता बॅनर्जी यांची राजकीय गरज आहे. ममता बॅनर्जी यांना 2011 मध्ये मुस्लिमांची 22 % मते मिळाली होती, 2021 मध्ये ती संख्या वाढून ममतांच्या पक्षाला 32 % मते मिळाली होती. याचा अर्थ मुस्लिमांवर ममतांचा प्रभाव वाढला होता.
– हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा धोका
पण त्याच वेळी पश्चिम बंगाल मध्ये भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना हिंदू मतांचे ध्रुवीकरण ममता बॅनर्जींना धोकादायक वाटते आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू मते वाचवण्यासाठी हुमायून कबीर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांचा आणि आपला आता काही संबंध राजकीय संबंध उरला नसल्याचे जाहीरपणे सांगितले, पण त्याच वेळी हुमायन कबीर यांनी आयोजित केलेल्या बाबरी मशिदीच्या पायाभरणी कार्यक्रमाला ममतांच्या सरकारने सर्व प्रकारचे सहकार्य केले.
– ममतांची डबल गेम
हुमायून कबीर यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यावेळी त्यांनी सगळीच्या सगळी मुस्लिम मते जरी घेतली, तरी त्यांचे जे काही आमदार निवडून येतील, ते नंतर ममता बॅनर्जी यांनाच पाठिंबा देतील आणि त्यांचे आमदार निवडून आले नाहीत, तरीही ममतांचे फार मोठे नुकसान होणार नाही. त्यामुळे एकीकडे तृणमूल काँग्रेसची मूळची हिंदू मते जशीच्या तशी टिकतील. ती भाजपकडे वळणार नाहीत आणि त्याच वेळी हुमायन कबीर यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून जर आमदार निवडून आणले, तर ते तृणमूळ काँग्रेसलाच पाठिंबा देतील याची “राजकीय व्यवस्था” ममता बॅनर्जींनी बाबरी मशीद पायाभरणी कार्यक्रमाच्या निमित्ताने करून ठेवली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App