विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : CM Fadnavis देशात महाराष्ट्र राज्य सौरऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठीचे फीडर सौरऊर्जेवर आणून स्वतंत्रपणे १६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची योजना आहे. ती पूर्ण झाल्यावर म्हणजे पुढील वर्षात उद्योगांसह अन्य वापराच्या वीज दरात दरवर्षी ३ टक्के स्वस्त वीज देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.CM Fadnavis
ते ऑरिक सिटी येथे ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत विश्वविक्रम केल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महावितरणने नोव्हेंबर या एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप बसवून उच्चांक गाठला.त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. गिनीजतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी ऑरिक सिटी मैदानावर झाला. या वेळी गिनीजचे कार्ल सॅबेले, मंत्री अतुल सावे, मेघना साकोरे-बोर्डीकर व स्थानिक आमदार उपस्थित होते.CM Fadnavis
सौरऊर्जा वाढल्याने वीज होऊ शकते स्वस्त
सद्य:स्थितीत तीन हजार मेगावॅट वीज उत्पादन होते. डिसेंबर २०२६ पर्यंतचे १६ हजार मेगावॅटचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्याला महावितरण ८ रुपयांनी विकत घेतलेली वीज दीड रुपयात देत होते. हा साडेसहा रुपयांचा तोटा उद्योगांकडून वसूल केला जात होता. नवीन सौर निर्मितीमुळे याची गरज पडणार नाही. उद्योगांना दिलासा मिळून विजेचे दर कमी होतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App