वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Modi भारत व रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंतच्या नवीन रोडमॅपला सहमती दर्शवली आहे. याअंतर्गत व्यापार ९ लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत आशा व्यक्त केली की, ९ लाख कोटी रुपयांचे व्यापाराचे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले जाईल.Modi
हैदराबाद हाऊसमध्ये शुक्रवारी मोदींनी युक्रेन युद्धाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी आवाहन केले. यावर पुतीन यांनी सहमती दर्शवली. मोदी म्हणाले, भारत तटस्थ नाही, तर शांततेच्या बाजूने आहे. पुतीन म्हणाले, रशिया आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे आणि युक्रेन युद्धाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी रशिया नेहमीच तयार आहे. सध्या भारत-रशियामध्ये व्यापार सुमारे पावणेसहा लाख कोटी रुपये आहे. दोन्ही देश आपापल्या चलनांमध्ये व्यापार ढाचा विकसित करण्यावर सहमत झाले आहेत.Modi
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारत आणि रशियादरम्यान कुशल कामगारांच्या गतिशीलतेवर देखील करार झाला आहे. याअंतर्गत भारतातील कुशल कामगार तात्पुरत्या स्वरूपात कामासाठी आता रशियाला जाऊ शकतील. हे महत्त्वाचे आहे कारण जर्मनी आणि इस्त्राईलनंतर रशिया भारतासोबत असा करार करणारा तिसरा देश बनला आहे. यापूर्वी शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. हैदराबाद हाऊसमध्ये बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी भारत-रशियाच्या व्यावसायिक नेत्यांसोबत भारतमंडपम येथे भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी पुतिन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन दिले.Modi
घोषणा… आता रशियाच्या नागरिकांना ३० दिवसांचा निःशुल्क पर्यटक व्हिसा
भारताने रशियन नागरिकांना ३० दिवसांचा निःशुल्क ई-टूरिस्ट व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी उपचार, वैद्यकीय शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. मुंबई विद्यापीठ, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी आणि रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या मॅनेजमेंट कंपनीदरम्यान शैक्षणिक सहकार्य वाढवण्याचा करार झाला.
भारत आणि रशियादरम्यान शुक्रवारी एकूण १० एमओयू आणि ६ करारांवर स्वाक्षरीदेखील झाली आहे.
राष्ट्रपती भवनात डिनर; पुतीन यांना ‘ऑल व्हेज थाळी’, ‘बदामाचा हलवा’
राष्ट्रपती भवनात शुक्रवारी पुतीन यांच्या सन्मानार्थ ठेवलेल्या डिनरमध्ये त्यांना ऑल व्हेज थाळी वाढण्यात आली. मेन कोर्समध्ये जाफरानी पनीर रोल, पालक मेथी मटार साग, आचारी वांगे, तंदुरी भरवा आलू, तुरीची डाळ, केसर पुलाव आणि रोट्या होत्या. गोडामध्ये बदामाचा हलवा, केसर पिस्ता कुल्फी आणि ताजी फळे वाढण्यात आली.
रशिया कच्च्या तेलाच्या नॉन-स्टॉप पुरवठ्यास तयार
पुतीन यांनी पुन्हा ऑफर दिली की, रशिया भारताला कच्च्या तेलाचा नॉन-स्टॉप पुरवठ्यास तयार आहे. भारताने रशियन कच्चे तेल खरेदी केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर २५% पेनल्टी टेरिफ लावला
पुतीन यांनी चेन्नई-व्लादिवोस्तोक दरम्यान ईस्टर्न मेरीटाईम कॉरिडॉर बनवण्यावर सहमती दर्शवली आहे. रशियाची जेएससी उरलकेम आणि भारताची राष्ट्रीय खत लि. यांच्यात खतांच्या पुरवठ्याबाबत एमओयू झाला आहे. पुतीन म्हणाले, भारत आणि रशियन नेतृत्वाखालील युरेशिया इकॉनॉमिक फोरम मध्ये व्यापार करार होईल. प्रसार भारती आणि रशियाच्या सरकारी मीडिया कंपन्यांमध्ये ५ वेगवेगळे करार देखील झाले आहेत.
वचन… दोन एस-४०० प्रणाली पुढील वर्षी
सूत्रांनुसार पुतीन यांनी २०२६ च्या अखेरीस दोन एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली देण्याचे वचन दिले आहे. सुदर्शन चक्रसाठी उपयुक्त असलेली पेंटसिर संरक्षण प्रणालीही दिली जाईल. पेंटसिर सिस्टिम सुदर्शन चक्रला कमी उंचीवरून उडणाऱ्या वस्तूंपासून वाचवू शकेल. हे सुदर्शन चक्रचा महत्त्वाचा भाग बनू शकेल, ज्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी या वर्षी लाल किल्ल्यावरून केली होती.
पाचव्या पिढीच्या सुखोई ५७ विमानांच्या ऑफरबद्दल भारतीय बाजूने स्पष्ट केले की, लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या एका निश्चित प्रक्रियेचे पालन करूनच या दिशेने पुढे जाता येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App