Putin India visit : भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ; व्यापारी तूट भरून काढायचे आव्हान भारत पेलणार कसे??

Russia

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर पोहोचत असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारे आणि प्रशासने यांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे. Putin India visit

– आकडे बोलतात

भारताला रशियन बाजारपेठ खुणावत असून भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी तूट भरून काढण्याचे आव्हान भारतापुढे आहे कारण भारत आणि रशिया यांच्यातला एकूण व्यापार 70 बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला असला आणि त्यातली वाढ तब्बल 708 % असली तरी भारताची रशियाला होणारी निर्यात 4.8 बिलियन डॉलर्सची आहे, तर रशियाकडून भारत करत असलेली आयात तब्बल 64 बिलियन डॉलर्सची आहे. यात तेलाची आयात 57 बिलियन डॉलर्सची आहे. याचा अर्थ भारत आणि रशिया यांच्यातल्या व्यापाराची तूट थोडी थोडकी ती तब्बल 59.2 बिलियन डॉलर्सची आहे. याचा अर्थ असा की भारताला ही तूट भरून काढण्यासाठी रशियाला मोठ्या प्रमाणावर भारतीय वस्तूंची निर्यात वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे भारत रशियन बाजारपेठेवर डोळा ठेवून असून भारत रशियाला भारतीय वस्त्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, हेवी इंजीनियरिंग वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची निर्यात करू शकतो. ती वाढवू शकतो. कारण आता भारताची तेवढी उत्पादनक्षमता वाढली आहे.

पुतिन यांच्या भारत दौऱ्यात त्यांनी टेरिफशी संबंधित काही मोठ्या सवलतींची घोषणा करणे अपेक्षित आहे, जी ट्रम्प टेरिफला छेद देऊन जाईल. पण त्या पलीकडे भारताची रशियाला होणारी निर्यात वाढू शकेल.

– 100 बिलियन डॉलर्सचे लक्ष्य

भारत आणि रशिया यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 बिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यातून भारत आणि रशिया यांच्या व्यापारातील भारताच्या बाजूने असलेली तूट भरून काढण्यावर भारताचा भर आहे.

भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध आणि व्यवहार पूर्वीपासूनच दृढ आणि मोठ्या उंचीवर आहेत. रशियाने भारताला सर्व प्रकारची लष्करी सामग्रीची मदत यापूर्वी पासून केली आहे त्यात आता लष्करी सामग्री तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि प्रदानाची भर पडली आहे. भारताला रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी सामग्री उत्पादना संदर्भातले तंत्रज्ञान मिळणे अपेक्षित आहे.

– कोणत्या क्षेत्रांमध्ये होणार करार??

पण त्या पलीकडे जाऊन भारत आणि रशिया यांच्यातले व्यापारी संबंध अधिक दृढमूल करण्यासाठी पुतिन यांचा दौरा लाभकारी ठरणार आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातल्या विविध क्षेत्रातल्या सहकार्याविषयीचे मोठे करार होणार आहेत. यामध्ये औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने, त्याचबरोबर सागरी वाहतूक उत्पादने यांचाही समावेश असून भारताला यानिमित्ताने रशियन बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.

– औषध निर्मिती ते सागरी उत्पादने

औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने आणि सागरी वाहतूक उत्पादने यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून, भारतीय उत्पादने जागतिक स्पर्धेत उतरून ती अनेक वेळा अव्वल ठरली आहेत. त्यामुळे रशियन बाजारपेठेत या भारतीय उत्पादनांना मोठी मागणी आहे.

पुतिन यांनी आपल्या दौऱ्यात रशियातील बड्या व्यापारांचा समावेश केला असून भारतीय व्यापारी आणि रशियन व्यापारी यांच्यात मोठे करार होणार आहेत. त्याचबरोबर शिपिंग हेल्थकेअर, फर्टीलायझर्स या क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठे करार होणे अपेक्षित आहे. हेल्थकेअर क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतातली हेल्थकेअर अधिक स्वस्त, परिणामकारक आणि लाभकारक आहे. त्यामुळे रशियन नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या सर्व करारांमधून भारतात विविध क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होणे सुद्धा अपेक्षित आहे.

त्यामुळे पुतिन यांच्या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले संबंध केवळ राजनैतिक, लष्करी आणि सामरिक न राहता ते व्यापाराच्या दृष्टीने अधिक विस्तारलेले होणे अपेक्षित आहे.

– केवळ अमेरिकन चष्मा नको

भारत आणि रशिया यांच्या संबंधांकडे केवळ अमेरिकन आणि युरोपियन चष्म्यातून न पाहता भारत आणि रशिया यांच्या स्वतंत्र दृष्टीकोनातून विकासात्मक भावाने त्याकडे पाहिले पाहिजे अशी दोन्ही देशांच्या सरकारांची भावना आहे.

India insist to filling up trade deficit with Russia

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात