Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे म्हणाले – वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत?

Nitesh Rane

वृत्तसंस्था

मुंबई : Nitesh Rane भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करत पर्यावरणवाद्यांवर तिखट हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेली बकरी कापण्याला विरोध करताना कधीच दिसत नाहीत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.Nitesh Rane

नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळ्याला देशभरातील साधूसंत येणार आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केले जाणार आहे. पण त्यासाठी तेथील तब्बल 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मंत्री नीतेश राणे यांनीही यासंबंधी अत्यंत आक्रमक भूमिका विषद केली आहे.Nitesh Rane



काय म्हणाले मंत्री नीतेश राणे?

तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा ते गप्प का? सर्व धर्म समभाव?, असे नीतेश राणे यांनी गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना नीतेश राणे यांनी हे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काँग्रेसची नीतेश राणेंवर टीका

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या प्रकरणी नीतेश राणेंवर निशाणा साधला आहे. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो, काय करत नाही, पुढची पिढी आपल्याला काय म्हणाले? याचा विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार विधान करणे शोभते का? आपले मंत्रिपद व राजकारण टिकवण्यासाठीच नीलेश राणे असे बोलतात. तपोवनातील वृक्षतोडीचे कुणी समर्थन करत असेल तर त्याचा अर्थ त्याला आपल्या पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे.

नाशिकमध्ये यापूर्वी कुंभमेळा झाला नाही का? शेकडो वर्षांपासून तिथे कुंभमेळा होत आहे. तेव्हा झाडे तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का झोडे तोडली जात आहेत? असा सवालही अतुल लोंढे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

वृक्षतोडीचा मुद्दा दिल्ली दरबारी

दुसरीकडे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले आहे. त्याद्वारे त्यांनी तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.

अजित पवारांचा पर्यावरणवाद्यांना पाठिंबा

तत्पूर्वी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वृक्षतोडीला विरोध करत या प्रकरणी सरकारला सामोपचाराने मार्ग काढण्याचे आवाहन केले होते. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते.

Nitesh Rane Tree Felling Eid Controversy Tapovan Nashik Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात