विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.Uddhav Thackeray
शिवसेनेच्या ठाकरे गटात आज मुंबई व उपनगरातील शेकडो शिवसैनिकांचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचा निवडक शब्दांत खरपूस समाचार घेतला. निवडणूक आयोग व न्यायालय यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. आता केवळ पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले.Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांवर साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काहीजण दिशाभूल झालेले अनेकजण पक्षाला सोडून गेले होते. पण आता ते पुन्हा परत येत आहेत. या सर्वांचे मी स्वागत करतो. मधल्या काळात सर्वांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यात आली होती. आणि नाही म्हटले तरी तुमच्या सारखे सर्व कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एकेक परत येत आहेत. हवेत प्रदूषण आहे, तसे राजकारणातही प्रदूषण आहे. पण जी धुळफेक होती, ती आता स्पष्ट होत आहे. गद्दारी करताना कारण काय दिले होते की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे आम्ही युती तोडली. पण आता त्यांनी त्यांचा गत काही वर्षांतील इतिहास पाहावा. त्यांना कल्याण डोंबिवलीची सभा आठवेल. या सभेत ते म्हणाले होते की, त्यात भाजप शिवसेना व शिवसैनिकांवर कसा अत्याचार करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देत आहे. असे नाटक करणारा एक आपण पाहिला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचे कारण दिले. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बसू शकत नाही. काँग्रेससोबत बसू शकत नाही असे ते म्हणाले होते. पण आता ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले होते. आता त्यांचे केवळ विसर्जन होण्याचे राहिले आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी का स्थापन केली?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडी स्थापन करण्यावरही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, काँग्रेससोबत शिवसेना गेली नाही. त्यावेळी भाजपने दगाबाजी केली. विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली. पण आता नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांच्याच पोस्टरवर सोनिया गांधींचे फोटो आहेत. जे मला शिव्या देत होते, त्यांच्या पोस्टरवर आनंद दिघे यांच्या बाजूला सोनिया गांधींचा फोटो दिसून येत आहे. ही सगळी लाचारी सत्तेसाठी सुरू आहे. एकतर त्यांना तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते. पण त्याहीपेक्षा तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हाची वट आजही ठाण्यात आपण ठेवली आहे.
आज भाजपचे कार्यकर्ते शिवसैनिकांना मारहाण करत आहेत. पण हे हू का चू करू शकत नाहीत. मग याला लाचारी नाही तर काय म्हणायचे? पण मला त्याची चिंता नाही. कारण, ठाणे हा शिवसेनेचे बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
भगवा व मशाल वेगवेगळी ठेवा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना शिवरायांचा पवित्र भगवा व मशाल हे आपले निवडणूक चिन्ह वेगवेगळे ठेवण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या भगव्यावर मशाल आहे. पण मी सर्वांना एक विनंती करतो की, भगवा आणि मशाल वेगळी ठेवा. कारण, शिवरायांचा भगवा हा तसाच पवित्र राहिला पाहिजे. त्याच्यावर कोणतेही चित्र छापू नका. कारण, भाजपचा तोच डाव आहे. त्यांनी त्यांच्या फडक्यावर हिरवा रंग लावलेलाच आहे. पण आपल्या हिंदू व मराठी जनतेची फसवणूक व्हावी, कुठेतरी गोंधळ व्हावा यासाठी ते भगव्यावर वेगवेगळी चित्रे लावून हे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत.
आपला पवित्र भगवा हाच मशालीसारखा दिसला पाहिजे. लांबून पाहिले तर भगवाच मशालीसारखा फडकताना दिसतो. त्यामुळे आपली मशाल छत्रपती शिवरायांची, हिंदुत्त्वाची, महाराष्ट्र धर्माची आणि शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हातात दिलेली मशाल घेऊन पुढे चला. मध्ये येणारी सर्व जळमटे व विरोधक या मशालीच्या तेजानेच भस्म होतील. हा मला आत्मविश्वास आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App