Cyclone Ditwah : चक्रीवादळ दितवाहमध्ये तामिळनाडूत 3 जणांचा मृत्यू, 149 जानवरेही ठार; 234 कच्ची घरे पडली

Cyclone Ditwah

वृत्तसंस्था

चेन्नई : Cyclone Ditwah चक्रीवादळ दितवामुळे झालेल्या पावसाशी संबंधित घटनांमध्ये तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तुतीकोरिन आणि तंजावरमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर मयिलादुथुराईमध्ये विजेचा धक्का लागून एका २० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.Cyclone Ditwah

राज्यमंत्री के. रामचंद्रन यांनी सांगितले की, किनारी भागात २३४ झोपड्या/मातीच्या घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, १४९ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सुमारे ५७,००० हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे.Cyclone Ditwah

श्रीलंकेत झालेल्या कहरानंतर, दितवाह चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी तामिळनाडू आणि पुडुचेरी किनारपट्टीवर धडकले. हवामान खात्याने कुड्डालोर, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टूसह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला.Cyclone Ditwah



भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “चक्रीवादळ दितवाह सध्या तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्याजवळ आहे. सकाळी ते किनाऱ्यापासून सुमारे ७० किमी अंतरावर होते. ते हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. त्याचा वाऱ्याचा वेग सध्या ७०-८० किमी/तास आहे, जो काही भागात ९० किमी/तास पर्यंत पोहोचू शकतो.”

एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह २८ हून अधिक आपत्ती प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र आणि गुजरातमधील एनडीआरएफ तळांवरून १० पथके चेन्नईत पोहोचली. शनिवारी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे ५४ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. चक्रीवादळामुळे पुडुचेरी केंद्रीय विद्यापीठाने सुट्टी जाहीर केली आहे आणि सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

वादळाचा 3 राज्यांवर परिणाम, काय आहे तयारी…

तामिळनाडू

14 NDRF पथके तैनात आहेत. पुणे आणि वडोदरा येथून आणखी 10 पथके चेन्नईला पाठवण्यात आली.
रामेश्वरम-चेन्नई सेक्टरमध्ये 11 रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
इंडिगोने जाफना, तूतीकोरिन आणि तिरुचिरापल्ली येथून ये-जा करणाऱ्या विमानांच्या फेऱ्या रद्द केल्या.

पुदुच्चेरी

पुदुच्चेरीमध्ये चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी 2 NDRF पथके तैनात करण्यात आली.
सेंट्रल युनिव्हर्सिटीने सुट्टी जाहीर करून सर्व परीक्षा पुढे ढकलल्या.
पुदुच्चेरी, कराईकल, माहे आणि यनममध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारपर्यंत बंद राहतील.
आंध्र प्रदेश

3 डिसेंबरपर्यंत आंध्र प्रदेशच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Cyclone Ditwah Damage Report Tamil Nadu 3 Deaths Houses Agriculture Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात