नवी मुंबईत 4500 कोटींचा जमीन घोटाळा; मंत्री शिरसाट यांच्या चौकशीसाठी समिती, मुख्य सचिवांचा आदेश

Navi Mumbai Land Scam

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या ४५०० कोटींच्या जमीन घोटाळाप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या चाैकशीची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली होती. गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन झाली. शिरसाटांवर आमदार रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

८ डिसेंबर रोजी नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही समिती स्थापन केल्याचे दिसत आहे. यशवंत बिवलकर यांच्याशी संबंधित ही जमीन आहे. चाैकशी समितीत मुख्य वनसंरक्षक ठाणे, जिल्हाधिकारी रायगड, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक, मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी ठाणे आणि रायगड व उपवनसंरक्षक अलिबाग यांचा समावेश आहे.



संबंधित प्रकरणी वन विभागाकडून पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र दीड महिना उलटला तरी पोलिसांकडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. अखेर सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीच्या सूचनेनुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी २४ नोव्हेंबरला बैठक घेऊन समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.

Navi Mumbai Land Scam 4500 Crore Shirsat Committee Rohit Pawar Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात