विशेष प्रतिनिधी
नागपूर : Chandrashekhar Bawankule देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे आधीपासूनच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. यापूर्वीही आम्ही सांगितले होते की शेतकऱ्यांच्या गळ्याशी येत असेल तर सरकार काही निर्णय घेईल म्हणून आम्ही शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. ज्यामुळे कोणीही शेतकऱ्यांच्या घरी जात तगादा लावणार नाही, असे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कुणी जर चुकीचे असेल तर निवडणूक आयोग आणि पोलिस कारवाई करतील. पण ज्यांच्या घरात पैसे आहेत ते त्यांनी कुठून आणले आहेत, कोणत्या व्यवहारातून आणले आहेत. हे सर्व पोलिस तपासतील. यामुळे भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले हे ठीक आहे पण कुणाच्या घरात, बेडरूममध्ये जात हे स्टिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार आहे का? हे बघावे लागेल, असे मालवण-मध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरात सापडलेल्या पैशाच्या बँग प्रकरणी बावनकुळे यांनी म्हटले आहे.Chandrashekhar Bawankule
पोलिस योग्य दखल घेतील
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नीलेश राणे यांनी असे का करावे हे मला माहिती नाही. पण कुणाच्या बेडरूमपर्यंत जात अशी व्हिडिओ शुट करणे हे मला नियमाच्या बाहेर वाटते आहे. पण नीलेश राणेंनी पोलिसांच्या आणि निवडणूक आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे तर याची ते योग्य दखल घेतील, या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे.
शरद पवारांनी निधीबद्दल बोलणं योग्य नाही
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सरकारच्या योजनांची मांडणी आम्ही करत असतो. निधी द्यायचे अधिकार सरकारकडे आहे. तिन्ही पक्ष निधी द्यायचा निर्णय घेतात.सर्वांना निधी देण्याचा अधिकार आहे तो निर्णय अंतिम करण्याचे काम मुख्यमंत्री करत असतात. शरद पवारांनी अनेक वर्षे सरकार चालवले आहे, अनेक वर्ष त्यांनी निधी वाटप केले आहे. त्यांनी अनेक निवडणुका या निधीची घोषणा करत जिंकल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे योग्य नाही.
शशिकांत शिंदेंनी हुरळून जाऊ नये
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सोलापुरातील एका तालुक्यात शिंदेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी हुरळून जाऊ नये.अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या युती झाल्या आहेत. स्थानिक राजकारणामध्ये मित्र पक्षांची पटले नाही तर कुणी शरद पवारांना सोबत घेतले तर कुठे धनुष्यबाण आणि काँग्रेस सोबत आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक 8 ते 10 वर्षांनी होत असल्याने प्रत्येक जण निवडणूक लढवत आहे.परिवहन आणि महसूल विभाग एकत्र आला आहे. यापूर्वी पोलिस विभाग आमच्यासोबत होताच. आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना लगाम घालणार आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App