नाशिक : बुडत्याला दिसली आधाराची काडी; पवारांच्या नेत्याने पाहिली भविष्याची नांदी!!, असेच म्हणायची वेळ पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या भाषणामुळे आली.
राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळ्यांत कमी उमेदवार उभे आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी सुद्धा मुकाबला करण्याची त्यांची स्थिती उरलेली नाही म्हणूनच बारामती आणि माळेगाव सारख्या घरच्या नगरपरिषदांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण पॅनल सुद्धा उभे करता आलेले नाही. स्वतः शरद पवार सुप्रिया सुळे हे या निवडणुकीत फारसे सक्रिय प्रचारात नाहीत. त्यांच्या ऐवजी युगेंद्र पवार सक्रिय प्रचारात दिसले.
– शशिकांत शिंदेंची हवा टाईट
शरद पवारांचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात सुद्धा त्यांच्या पक्षातली राजकीय धुगधुगी इतर पक्षांच्या टेकूवर टिकून राहिली आहे. वास्तविक सातारा जिल्ह्यातले शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्या प्रभावाखालच्या भाजपने तिथे शशिकांत शिंदे यांची हवा पुरती टाइट करून टाकली आहे म्हणून शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यातही फारसे कर्तृत्व दाखवायला वाव उरलेला नाही सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये कुठल्या ना कुठल्या दुसऱ्याच पक्षाचा टेकू घेऊन शशिकांत शिंदे यांनी दोन-चार नगरपालिकांमध्ये पॅनल उभी केली आहे.
– शिंदे – पवार आघाडी फक्त कुर्डूवाडी पुरती
पण याच शशिकांत शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडी मध्ये भाषण करताना आपल्याला भविष्यातली नांदी दिसल्याचे सांगितले. कुर्डूवाडीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांची युती करून स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पॅनल उभे केले त्याच्या प्रचारासाठी त्यांनी शशिकांत शिंदे यांना बोलाविले शशिकांत शिंदे यांनी तिथे जाऊन आपल्याला राज्यातल्या भविष्याची नांदी या दोन शिंदेंच्या युतीमधून दिसते, असा दावा केला.
– बुडत्याला दिसली आधाराची काडी
एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपचे नेते स्थानिक पातळीवर फोडतात या बातम्यांनी महाराष्ट्रात थैमान घातले असताना शशिकांत शिंदे यांनी मध्येच शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर एकनाथ शिंदे यांची युती राज्यभर होईल, अशा शब्दांची काडी टाकली. पण ही बुडत्याला दिसलेली आधाराचीच काडी ठरली. कारण एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करायची म्हणजे नेमके काय करायचे??, उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची युती करून नेमके काय मिळविले??, याची पक्की माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते यांच्यात खरा खोटा संघर्ष असला आणि त्यात वर्चस्वाची लढाई असली तरी ती किती ताणून कुठपर्यंत न्यायची आणि शरद पवारांच्या सारख्या anti midas touch असलेल्या नेत्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करून आपले कायमचे नुकसान करून घ्यायचे का??, हे नक्कीच माहिती आहे.
– पवारांशी आघाडी करून शिंदे कशाला मातीत जातील??
त्यामुळे भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवर स्वबळ वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला त्याच मार्गांचा अवलंब शिवसेनेने करून कुर्डूवाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तात्पुरती आघाडी केली आहे. त्या पलीकडे यात कुठलीही भविष्याची नांदी वगैरे काही नाही. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर राज्यात जाऊन कायमचे मातीत जाण्याची एकनाथ शिंदे यांची सध्या तरी तयारी दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App